कोविड महामारीनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होताना पाहायला मिळत आहे. ही गुंतवणूक वैयक्तिक आणि व्यावसायिक ठिकाणी केली जात आहे. त्यामुळेच रिअल इस्टेट क्षेत्रातील घरांच्या आणि दुकानांच्या भाड्यात वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. सध्या भारतात डॉलर होम्स (Dollar Homes) ही संकल्पना चांगलीच विकसित झाली आहे. त्यामुळे भारतातील डॉलर होम्सच्या घरभाड्याच्या किंमतीत 40 ते 50% वाढ पाहायला मिळत आहेत. परंतु डॉलर होम्स म्हणजे नक्की काय? त्याचे मासिक भाडे किती असते आणि भारतातील कोणत्या शहरात त्याचे प्रमाण वाढत आहे, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
डॉलर होम्स म्हणजे काय?
डॉलर होम्स (Dollar Homes) म्हणजे ज्या घरात मॉडर्न सुखसुविधा देण्यात आल्या आहेत. त्या घरात राहायला जाताना भाडेकरूला कोणताही अतिरिक्त खर्च जसे की, फर्निचर, इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी, किचनमधील सामानाची खरेदी करावी लागत नाहीत. सर्व अमेनिटीज त्या ठिकाणी उपलब्ध असतात. हे घर भाड्याने घेतले जाते. मात्र त्याचे भाडे सर्वसामान्य लोकांना परवडणारे नसते.
हे घर भाड्याने परदेशातील लोक घेतात. भारतात उद्योगधंद्यासाठी किंवा इतर कामानिमित्ताने ठराविक कालावधीसाठी राहायला आलेले परदेशी लोक अशा स्वरूपातील घर भाड्याने घेतात. म्हणून याला डॉलर होम्स असे म्हणतात. सध्या याच घरांच्या भाड्याच्या किंमतीत 40 ते 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळत आहे. भारतातील उच्च आर्थिक वर्गातील लोकं देखील डॉलर होम्स भाड्याने घेतात.
भारतात डॉलर होम्सचे प्रमाण कोणत्या शहरात वाढत आहे?
देशातील मुंबई, दिल्ली आणि गुरुग्राम शहरात डॉलर होम्सचे प्रमाण वाढत आहे. यामागे कारण म्हणजे ही देशातील प्रमुख शहरे आहेत. या शहरात मोठमोठे उद्योगधंदे, नोकरीच्या संधी आणि महाविद्यालयीन कॉलेज आहेत.
डॉलर होम्सचे मासिक भाडे किती?
ब्रोकर्स रिपोर्टमधील माहितीनुसार दर 24 तासाला एक डॉलर होम भाड्याने देण्यात येत आहे. त्यामध्ये देखील भाडेकरू बोली लावताना पाहायला मिळत आहेत. डॉलर होम्सच्या घराच्या भाड्याची सुरुवात 3 लाख रुपये प्रति महिन्यापासून ते 14 लाख प्रति महिना इतकी आहे.
सुश क्लेज काय सांगतात?
वेलकम होम लक्झरी रिअल इस्टेट सर्व्हिसेसचे फाउंडर सुश क्लेज यांनी डॉलर होम्स बाबत माहिती देताना सांगितले की, या घरांची संख्या फारच कमी आहे. सुश क्लेज (Sush Klej') यांची ही कंपनी परदेशी नागरिकांना डॉलर होम्स मिळवून देण्यात मदत करते. त्यांनी पुढे सांगितले की, परदेशी नागरिकांना डॉलर होम्सच हवे असतात. ज्यामध्ये हाय क्वालिटी मॉडर्न किचन, डिव्हाईसेस,ब्रँडेड सामान, उत्तम इंटेरिअर देण्यात आलेले असते. याशिवाय अशी घरे नामांकित शाळा, कॉलेज, दवाखाने आणि मॉल्स यांच्या शेजारी असावीत अशी मागणी असते.
Source: hindi.moneycontrol.com