Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Important Things After Marriage: लग्न झाल्यानंतर लगेच नवदांपत्याने कराव्यात 'या' 4 महत्त्वाच्या गोष्टी...

Important Things After Marriage

Important Things After Marriage: लग्न ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. लग्नानंतर पती-पत्नी दोघांच्याही सामाजिक आणि आर्थिक जवाबदरीत भर पडते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर नवदांपत्याने काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊयात.

सध्या लग्नाचा सीजन (Wedding Season) सुरू आहे. त्यामुळे आपल्याला जिकडे तिकडे लग्नसराई पाहायला मिळत आहे. लग्न ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. लग्नानंतर पती-पत्नी दोघांच्याही आयुष्यातील सामाजिक आणि आर्थिक जवाबदरीत भर पडते. त्यामुळे लग्न करण्यापूर्वी आणि लग्नानंतर आर्थिक गोष्टींचे नियोजन करणे अतिशय महत्त्वाचे आहे. लग्नानंतर नवदांपत्यानी लगेचच कागदपत्रातील महत्त्वपूर्ण बदल करणे, विवाह नोंदणी करणे, बँकेत अकाउंट ओपन करणे आणि आरोग्य विमा काढणे यासारख्या महत्त्वाच्या गोष्टींची पूर्तता करण्यावर भर द्यायला हवा.

कागदपत्रांमधील महत्वपूर्ण बदल (Significant changes in documentation)

लग्नानंतर मुली माहेर सोडून सासरी येतात.  स्वतःच्या नावापुढे नवऱ्याचे नाव लावतात. हा एक महत्त्वाचा बदल असतो. हा बदल कागदोपत्री देखील केला जातो. त्यामुळे आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदार ओळखपत्र आणि रेशनकार्ड यासारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर लग्नानंतर नावामधील झालेला बदल लवकरात लवकर नोंदवणे गरजेचे असते. नावातील फेरबदला सोबत रहिवासी पत्ता देखील बदलणे गरजेचे आहे. हे बदल लग्नानंतर लगेच नाही केले, तर पुढे जाऊन अतिशय त्रास सहन करावा लागू शकतो.

विवाह नोंदणी करणे (Registering a marriage)

लग्न झाल्यानंतर लगेचच नवदांपत्यानी विवाह नोंदणी करणे गरजेचे आहे. विवाह नोंदणीसाठी (Marriage Register) जितका जास्त वेळ लावला जाईल, तितके शुल्क अधिक आकारले जातात. त्यामुळे तुमच्या जवळील ग्रामपंचायत ऑफिसमध्ये किंवा नगरपालिकेत जाऊन विवाह नोंदणी करणे अतिशय गरजेचे आहे. विवाह नोंदणी ही तुमच्या लग्नाचा महत्त्वपूर्ण दाखला आहे.

आरोग्य विमा काढणे (Taking health insurance)

लग्न कार्यात प्रचंड पैसा खर्च होतो. हा क्षण आयुष्यात पुन्हा नाही, या विचाराने अनेकजण लाखो- कोटी रुपये लग्नात खर्च करतात. मात्र आर्थिक गरज ही लग्नानंतर जास्त असते. लग्नानंतर जवाबदारी वाढल्याने साहजिकच खर्च ही वाढतात. सध्या पती पत्नी दोघेही नोकरी करणारे असतात. त्यामुळे त्यांच्या स्वतःचा आरोग्य विमा (Health Insurance) असतो. मात्र आजही बहुतांश लोक आरोग्य विमा काढत नाहीत. आजारपण हे कधीच सांगून येत नाही. त्यामुळे जर स्वतःचा किंवा स्वतःच्या जोडीदाराचा आरोग्य विमा नसेल, तर तो लगेच काढून घ्या. आरोग्य विम्यामुळे तुमचा भविष्यातील अवाजवी वैद्यकीय खर्च टाळला जातो किंवा त्याचे नियोजन केले जाते.

लग्न झाल्यावर साहजिकच खर्च वाढतात. हे खर्च दोघांनीही विभागून घेतले तर एकावर कोणताही भार पडत नाही. त्यासाठी दोघांचे बँकेमध्ये जॉईंट अकाउंट (Joint Account) असणे गरजेचे आहे. जॉईंट अकाउंटचे अनेक फायदे आहेत. त्यावर बँकेकडून अनेक वेगवेगळ्या सुविधा दिल्या जातात. जर जॉईंट अकाउंट नसेल काढायचे, तर किमान दोघांकडे स्वतःचे स्वतंत्र बँक खाते असणे गरजेचे आहे. कोणताही आर्थिक व्यवहार करण्यासाठी बँक खाते असणे गरजेचे आहे.