Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RBI MPC Meeting: आरबीआयची रेपो दरात 35 बीपीएसने वाढ; कर्जे महागणार!

RBI MPC Meeting December 2022

Image Source : www.rediff.com

RBI MPC Meeting December 2022: आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी बुधवारी (दि.7 डिसेंबर, 2022) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक संपल्यानंतर रेपो दरात 35 बीपीएस पॉईंटने वाढ केल्याची घोषणा केली. यामुळे रेपो दर आता 6.25 टक्के झाला. तर देशाचे 2023 या आर्थिक वर्षातील सकल राष्टीय उत्पन्न (GDP) 7 टक्क्यांवरून 6.8 टक्के आणले आहे.

RBI Monetary Policy Committee Meeting December 2022: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया (RBI)च्या अंतर्गत असणाऱ्या पतधोरण समितीच्या (मॉनेटरी पॉलिसी कमिटी) बैठकीनंतर बुधवारी (दि.7 डिसेंबर) रेपो दर (Repo Rate) 35 बेसिस पॉईंटने वाढवून 6.25 टक्के केल्याची घोषणा आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली.

रिझर्व्ह बॅंक इंडियाचा नव्याने वाढवण्यात आलेला रेपो रेट ऑगस्ट, 2018 पासूनचा सर्वाधिक दर आहे. आरबीआयने या आर्थिक वर्षात पाचव्यांदा रेपो दरामध्ये वाढ केली. सुरूवातील मे महिन्यात आरबीआयने 40 बीपीएस पॉईंटने रेपो दरात वाढ केली होती. त्यानंतर जून, ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये प्रत्येकी 50 बीपीएस पॉईंटने वाढ केली. तर यावेळी पाचव्यांदा 35 बीपीएस पॉईंटने वाढ करण्यात आली आहे.

होम लोन महागणार?

आरबीआयने आतापर्यंत 4 वेळा रेपो दरात वाढ केली. प्रत्येकवेळी आरबीआयच्या रेपो दरवाढीनंतर देशातील सार्वजनिक आणि खाजगी बॅंकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली. त्यामुळे यावेळीही बॅंका व्याजदरात वाढ करण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वसामान्यांचे होम लोन, कार लोन महागण्याची शक्यता आहे. तसेच ज्यांचे लोन सुरू आहे; त्यांच्या ईएमआय किंवा कर्जाचा कालावधी वाढू शकतो.

मार्केटमधील तज्ज्ञांनी आणि काही अर्थतज्ज्ञांनी रेपो दरात आरबीआय 35 बीपीएसने वाढ करेल अशी शक्यता वर्तवली होती. कारण महागाई दर अजूनही 6 टक्क्यांच्यावर असल्याने आरबीआयने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जाते. रबीआयचे असेही म्हणणे आहे की, येणाऱ्या काळात भारताची अर्थव्यवस्था ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेतील या वाढीला ग्रामीण, उत्पादक क्षेत्र आणि सर्व्हिस सेक्टरचा फायदा होणार आहे.

जीडीपी दर 7 टक्क्यांवरून 6.8 टक्के!

शक्तीकांत दास यांनी सांगितले की, 2023 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर हा 6.8 टक्के असेल, असा अंदाज आहे. यापूर्वी आरबीआयने हा दर 7 टक्के असल्याचे घोषित केले होते. तसेच भारताचे कृषि क्षेत्र हे लवचिक असून मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टरमध्ये भारताने नोव्हेंबर महिन्यात वाढ दर्शवली आहे. त्याचबरोबर सरकारकडून गुंतवणूक योजनांना चांगली चालना मिळत असल्याचेही दास यांनी म्हटले.

तिसऱ्या तिमाहीत इकॉनॉमिक ग्रोथ 4.4 टक्क्यांवर!

2023 या आर्थिक वर्षातील आर्थिक विकासाचा दर तिसऱ्या तिमाहीत 4.4 टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी तो 4.6 टक्के होता. तर चौथ्या तिमाहीचा दर 4.6 टक्क्यांवरून 4.2 टक्क्यांवर आला आहे.