Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Mediclaim Policy for Social Workers: सामाजिक कार्यकर्त्यांना राष्ट्र सेवा दल देणार आरोग्य विमा सुरक्षा

Rashtra Seva Dal

Image Source : www.rashtrasevadal.org

Rashtra Seva Dal: आयुष्यभर सामाजिक चळवळीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आता आधार उरला नाही. कुटुंब प्रमुख म्हणून तोडक्या आर्थिक संसाधानात प्रपंच चालवला खरा परंतु मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य आदी विषयांचे काय? यावर महाराष्ट्राच्ता सामाजिक क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरु आहे. याच चर्चेला कृतीत आणण्याचा निर्णय राष्ट्र सेवा दलाने घेतला आहे.

समाजात सकारात्मक बदल व्हावा म्हणून अनेक लोक कार्यरत असतात.अनेकदा घरा-दाराचा विचार न करता, मुलाबाळांचा विचार न करता आणि मुख्य म्हणजे आर्थिक नियोजन न करता सामाजिक कार्यकर्ते राबत असतात. समाजाचे भले व्हावे हा त्यांचा शुध्द हेतू असला तरी आर्थिक नियोजन न केल्यामुळे कार्यकर्त्यांना आणि  त्यांच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते.

कोविड संक्रमणाच्या दरम्यान अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावले आहे. या दरम्यान आरोग्य विमा आणि जीवन विमा यांचे महत्व बऱ्यापैकी लोकांना समजले आहे. परंतु सामाजिक कार्यकर्त्यांच्या बाबतीत अजूनही याबाबत नकारात्मक चित्र दिसते आहे.

अलीकडेच महाराष्ट्रातील काही सामजिक कार्यकर्त्यांच्या आकस्मिक मृत्यू झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. आयुष्यभर सामाजिक चळवळीसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आता आधार उरला नाही. कुटुंब प्रमुख म्हणून तोडक्या आर्थिक संसाधानात प्रपंच चालवला खरा परंतु मुलाबाळांचे शिक्षण, आरोग्य आदी विषयांचे काय? यावर महाराष्ट्राच्ता सामाजिक क्षेत्रात गेल्या महिनाभरापासून चर्चा सुरु आहे. याच चर्चेला कृतीत आणण्याचा निर्णय राष्ट्र सेवा दलाने घेतला आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांना आरोग्य विमा सुरक्षा

राष्ट्र सेवा दलाचे विद्यमान अध्यक्ष, चित्रपट आणि मालिका निर्माते नितीन वैद्य (Nitin Vaidya) यांनी पुढाकार घेऊन कोणा सामाजिक कार्यकर्त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना आर्थिक संरक्षण लाभेल अशी तजवीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

महामनी डॉट कॉमशी बोलताना नितीन वैद्य म्हणाले की,  कोविडच्या काळात मुंबईच्या मनोरंजन व्यवसायातील कामगार, तंत्रज्ञ, कलाकार, लेखक अशा जवळपास 30 हजार लोकांचा सामूहिक कोविड विमा काढण्याचं पाऊल मालिका व चित्रपट निर्माते तसंच विविध कामगार / तंत्रातील संघटना व वाहिन्या यांनी मिळुन उचललं होतं. त्यात दोन लाख रूपयांपर्यंतचा उपचाराचा खर्च व कोणाचा मृत्यु झाल्यास त्याच्या कुटुंबियांना ₹25 लाख अशी व्यवस्था केली होती. अनेकांचे उपचार त्यात झाले व किमान 12-15 जणांच्या कुटुंबियांना ₹25 लाख मिळवुन देण्यात आले. वाटाघाटी करून प्रीमियमची रक्कम प्रत्येक व्यक्तिमागे वर्षाला अडीच हजार रूपये इतकी करण्यात आली होती.

मनोरंजन व्यवसाय हा पूर्णतः असंघटित आहे, तरीही हे घडले. असं काही सामाजिक क्षेत्रात काम करणारांसाठी करणार आहोत अशी माहिती नितीन वैद्य यांनी दिली आहे.

स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करता कामा नये

सामाजिक चळवळीत तर अर्थार्जनाकडे दुर्लक्षच केले जाते. यामुळे प्रकृतीची आणि पर्यायाने कुटुंबाची हेळसांड होत असेत. असे चित्र सध्या सार्वत्रिक दिसते आहे, असे वैद्य म्हणाले. धूम्रपान, मद्यपान, आहारातला अत्यंत अनियमितपणा, आयुष्यातले ताणतणाव, हेही अनेकांना आपल्यातुन हिरावुन नेताना पहायला मिळत आहे.

वयाने कितीही असा, पण शरीर वेळोवेळी सिग्नल देतं; ते सर्वांनीच गंभीरपणे घेतलं पाहिजे. चाळीशी ओलांडलेल्या प्रत्येकाने वर्षातुन एकदा संपूर्ण वैद्यकीय तपासणी केलीच पाहिजे. आयुष्यात इतर ताणतणाव असतील, तर मानसशास्त्रीय सल्ला घेतला पाहिजे. वाईट सवयी सोडल्या पाहिजेत असेही ते म्हणाले.

माहिती संकलन मोहीम सुरु 

महाराष्ट्रभरात सामाजिक कार्यात वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांचा आरोग्य विमा उतरवून घेतला जाणार आहे. कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना यामुळे संरक्षण मिळणार आहे. राष्ट्र सेवा दलातर्फे महिनाभरात कार्यकर्त्यांची माहिती संकलित केली जाणार आहे. दिलेल्या माहितीच्या आधारे सामाजिक कार्यकर्त्यांना विमा संरक्षण दिले जाणार असल्याची माहिती राष्ट्र सेवा दलाचे खजिनदार कबीर पळशीकर यांनी दिली आहे. याबाबत विविध विमा कंपन्यांशी बोलणे सुरु असून, अधिकाधिक लाभ देणाऱ्या कंपन्यांकडून ही सुविधा घेतली जाणार आहे.

सामाजिक कार्यकर्त्यांचे अर्थसाक्षर होणे गरजेचे 

(Financial Literacy ) अर्थसाक्षरता ही काळाची गरज आहे. पैशाचे नियोजन, आरोग्य विम्याचे, जीवन विम्याचे नियोजन वेळीच होणे गरजेचे आहे. अजूनही सामाजिक क्षेत्रात याबद्दल गंभीरता दिसत नाही. यासाठी गरज भासल्यास महामनी तर्फे अर्थसाक्षरतेविषयी मोफत कार्यशाळा घेण्याचाही विचार पुढे आला आहे. सामाजिक कार्यकर्ते ही समाजासाठी लाभलेली एक देणगी असते, आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी वाहून घेणारे कार्यकर्ते ही समाजाची एक मौल्यवान संपत्ती असते. त्यांच्यासाठी धोरणात्मक निर्णय होत असतील तर त्याचे स्वागतच केले पाहिजे.