Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Krushi Yantrikikaran Scheme: राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना; जाणून घ्या काय आहे पात्रता?

Krushi Yantrikikaran Scheme

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे शेतीतील यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यात येते. तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2022 चा लाभ मिळवायचा असेल तर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. मुख्य पृष्ठावरून ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरावा लागेल.

महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाद्वारे राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना राबविण्यात येते. या योजनेद्वारे शेतीतील यांत्रिकीकरणास प्रोत्साहन देण्यात येते.  ज्या शेती क्षेत्रामध्ये यंत्रांचा वापर कमी आहे अशा क्षेत्रामध्ये व अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांपर्यंत कृषी यांत्रिकीकरणाचा लाभ पोहोचविणे. प्रात्यक्षिके व मनुष्यबळ विकासाद्वारे शेतकऱ्यांमध्ये जगजागरुकता निर्माण करण्याचा उद्देश या योजनेमागे ठेवण्यात आला आहे. 

या योजनेद्वारे ट्रॅक्टर, मनुष्य चलित यंत्र/अवजारे, प्रक्रिया संच, पिकांच्या काढणीसाठीची यंत्रे, फलोत्पादन यंत्र/अवजारे, वैशिष्ट्यपूर्ण यंत्र अवजारे, स्वयं चलित यंत्रे घेण्यासाठी अर्थसहाय्य देण्यात येईल.

अर्ज कसा करावा? (How to apply)

तुम्हाला जर Krushi Yantrikikaran Yojana 2022 चा लाभ मिळवायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल. मुख्य पृष्ठावरून ऑनलाइन पद्धतीने तुम्हाला अर्ज भरावा लागेल.

योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहेत? (Eligibility for scheme) 

1)शेतकऱ्याचे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे
2) शेतकऱ्याकडे 7/12 उतारा व 8 अ असावा
3) शेतकरी अनु. जाती, अनु.जमाती मधील असल्यास जातीचा दाखला आवश्यक
4) फक्त एकाच अवजारांसाठी अनुदान देय राहील म्हणजेच ट्रॅक्टर किंवा यंत्र/ अवजार
5) कुटुंबातील व्यक्तीच्या नावे ट्रॅक्टर असल्यास ट्रॅक्टरचलित अवजारांसाठी लाभ मिळण्यास पात्र असेल परंतु ट्रॅक्टर असल्याचा पुरावा सोबत जोडणे आवश्यक.
6) एखाद्या घटकासाठी/अवजारांसाठी लाभ घेतला असल्यास त्याच घटक/ अवजारांसाठी पुढील 10 वर्षे अर्ज करता येणार नाही. परंतु इतर अवजारांसाठी अर्ज करता येईल. उदा. एखाद्या शेतकऱ्याला सन 2018-19 मध्ये ट्रॅक्टरसाठी लाभ देण्यात आला असेल तर पुढील 10 वर्षे ट्रॅक्टरसाठी लाभ मिळण्यास पात्र ठरणार नाही. 

योजनेच्या लाभासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती?  (Which documents required)

1)आधार कार्ड
2)7/12 उतारा
3) 8 अ दाखला
4) खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल
5) जातीचा दाखला ( अनु. जाती व अनु. जमातीसाठी )
6) स्वयं घोषणापत्र
6) पूर्वसंमती पत्र