Rajarshi Shahu Maharaj Scholarship Scheme : राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप 2022-23 महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर आहे. सध्या बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या किंवा नुकतीच बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप उपलब्ध आहे. संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या या स्कॉलरशिप योजनेत विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचे असेल तर ते मराठा समाजाचे असणे आवश्यक आहे. राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिपमध्ये सहभागी होऊन तुम्हाला आर्थिक प्रोत्साहन मिळू शकेल जे भविष्यात तुमच्यासाठी व्यावसायिक करिअरच्या विकासाच्या संधी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते. राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप 2023 ही स्कॉलरशिप महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी लाभार्थी या स्कॉलरशिपचा लाभ घेऊ शकतात.
Table of contents [Show]
राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिपचे पात्रता व निकष
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- या स्कॉलरशिपसाठी पात्र होण्यासाठी उमेदवार सध्या इयत्ता 12 मध्ये असला पाहिजे.
- त्याने बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
- अर्जदार हा EBC (Economical Backward Class) खुल्या प्रवर्गाचा असावा.
- अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्व स्त्रोतांकडून 8,00,000 पेक्षा जास्त नसावे.
- उमेदवाराने सर्वसाधारण कोट्यातून अभ्यासक्रमात प्रवेश घेतला असावा.
- कुटुंबातील फक्त पहिली 2 मुले स्कॉलरशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.
राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिपचे फायदे
राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिप अंतर्गत शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क 100 टक्के दिले जाते, या स्कॉलरशिप योजनेंतर्गत Medical, Engineering and other Professionals अभ्यासक्रमांसारखे 605हून अधिक अभ्यासक्रम समाविष्ट आहेत. दरवर्षी 5 लाखांहून अधिक विद्यार्थी शिष्यवृत्तीचा लाभ घेतात. 2,50,000च्या अंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादेसह Government funded professional अभ्यासक्रमांना 100 टक्के ट्यूशन फी कव्हरेज मिळते.
2,50,000 ते 8,00,000च्या वार्षिक उत्पन्न मर्यादेसह Government funded professional अभ्यासक्रम शिकणार्या विद्यार्थ्यांना 50 टक्के ट्यूशन फी कव्हरेज मिळते. व्यावसायिक अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या 50 टक्के रक्कम मिळते. Non-Professional Courses शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्काच्या 100 टक्के रक्कम मिळते. पुस्तके आणि स्टेशनरी भत्ता 5000 रुपये सुद्धा मिळतात.
राजर्षी शाहू महाराज स्कॉलरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे
- अधिवास प्रमाणपत्र
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- 2 मुलांच्या संदर्भात कौटुंबिक पत्रक
- मागील वर्षाची मार्कशीट
- प्रतिज्ञापत्र (Affidavit)
- अर्जदाराचे पॅन कार्ड
- अर्जदाराच्या वडिलांचे पॅनकार्ड
- आधार कार्ड
- शैक्षणिक गॅप असल्यास गॅप प्रमाणपत्र
- फी भरल्याची पावती.
नियम आणि अटी
- मागील वर्षी स्कॉलरशिप मिळालेल्या उमेदवारांनी नूतनीकरणासाठी अर्ज करावा.
- अभ्यासक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये 2 वर्षांचे अंतर नसावे.
- स्कॉलरशिप लाभ मिळविण्यासाठी उमेदवाराने वार्षिक सेम सबमिट करणे आवश्यक आहे.
- परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे.
- अभ्यासक्रमादरम्यान अर्जदाराला इतर कोणत्याही स्रोताकडून कोणतीही स्कॉलरशिप किंवा स्टायपेंड मिळाला नसावा.
अर्ज कसा करावा?
महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अनेक स्कॉलरशिप योजना आहेत. त्या सर्व Mahadbt Scholarship Website वर देण्यात आलेल्या आहेत. जेपर्यंत यावेबसाइटवर नवीन खाते ओपन करून स्कॉलरशिपसाठी अर्ज केला जात नाही, तोपर्यंत कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना Mahadbt वेबसाइटलर नोंदणी करणे आवश्यक आहे.