Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Rainbow IPO : रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअरचा भांडवली बाजारात प्रवेश

Rainbow IPO : रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअरचा भांडवली बाजारात प्रवेश

रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर (Rainbow Children’s Medicare) कंपनीचा आज 27 एप्रिल रोजी आयपीओ ओपन झाला असून 29 एप्रिलपर्यंत तो लिलाव प्रक्रियेसाठी खुला असणार आहे.

नवजात बालकांच्या विविध आजारांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर (Rainbow Children’s Medicare) कंपनीचा आज 27 एप्रिल रोजी आयपीओ ओपन झाला आहे. 29 एप्रिलपर्यंत यासाठीची लिलाव प्रक्रिया खुली असणार आहे. रेनबो कंपनी आयपीओच्या माध्यमातून 1,595 कोटी रूपये उभारणार असून, कंपनीने प्रति शेअरची किंमत 516-542 यादरम्यान ठेवली आहे. कंपनी आयपीओद्वारे मिळणाऱ्या एकूण रकमेपैकी 170 कोटी रूपये नवीन रूग्णालयांची निर्मिती आणि नवीन रूग्णालयांसाठी वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी, तसेच कॉर्पोरेट विस्तारासाठी वापरणार आहे.

रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर आयपीओबद्दल

आयपीओच्या माध्यमातून 1,595 कोटी रुपये उभारण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने आयपीओ अंतर्गत 280 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स आणले आहेत. याशिवाय 2.4 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल (OFS) मध्ये विकला जाणार आहेत.

अँकर गुंतवणूकदारांकडून 470 कोटी रुपये

रेनबो चिल्ड्रन मेडिकेअर कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 470 कोटी रुपये उभे केले आहेत. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांना प्रति शेअर 542 रुपये दराने दिले असून 87 लाख शेअर्सचे वाटप केले. तसेच अँकर गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स किमतीच्या वरच्या बँडवर शेअर्स दिले आहेत.

रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर 

रेनबो चिल्ड्रन्स मेडिकेअर नवजात बालकांवरील विविध उपचारांसाठी प्रसिद्ध आहे. रेनबोने हैदराबादमध्ये 1999 मध्ये सर्वांत पहिले बालरोग विशेष रुग्णालय सुरू केले होते. त्यानंतर 30 सप्टेंबर 2021 पर्यंत रेनबोची एकूण 1,500 खाटांची क्षमता असलेली सहा शहरांमध्ये 14 रुग्णालये आणि तीन दवाखाने आहेत.