Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

RVNL Share Price: रेल्वे विकास निगमचे 2 दिवसांत 13 टक्क्यांनी शेअर्स वाढले, पण कारण काय?

RVNL Share Price Rise

Image Source : www.timesofindia.indiatimes.com

RVNL Share Price Rise: रेल्वे विकास निगमला 1 हजार 134 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाल्यानंतर, कंपनीचे शेअर्स दोन दिवसांत 13 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सबद्दलची सर्व माहिती पुढे वाचा.

Buzzing Stocks: रेल विकास निगम लिमिटेड (Rail Vikas Nigam Limited) शेअर्स बीएसईवर (BSE: Bombay Stock Exchange) शुक्रवारच्या म्हणजे 13 जानेवारी रोजी इंट्रा-डे ट्रेडमध्ये 5 टक्क्यांनी वाढले होते. इंट्रा-डेमध्ये 79.35 रुपयांचा उच्चांक गाठला तर, 77.25 रुपये निच्चांकावरही गेले होते. गेल्या दोन दिवसांत शेअर 13 टक्क्यांनी वधारला आहे.

रेल विकास निगमने (RVNL) माहिती दिली की कंपनीने दक्षिण रेल्वेच्या ताडुकू-रेनिगुंटा विभागात स्वयंचलित ब्लॉक सिग्नलिंगच्या तरतुदीसाठी दक्षिण रेल्वेकडून स्वीकृती पत्र मागितले आहे. या प्रकल्पाची किंमत 38.97 कोटी रुपये आहे. हा प्रकल्प 15 महिन्यांत पूर्ण होणार आहे.

कंपनीने 11 जानेवारी रोजी घोषित केले की त्यांनी 1 हजार 134 कोटी रुपयांचा चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्प जिंकला आहे आणि हा प्रकल्प 1 हजार 65 दिवसांत पूर्ण होणार होता. रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी एक एलिव्हेटेड व्हायाडक्ट, नऊ एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन आणि एक स्थिर व्हायाडक्ट बांधणार आहे.

गेल्या आठवड्यात, 5 जानेवारी रोजी, रेल्वे विकास निगमने (RVNL) सांगितले की त्यांना गुजरात मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (GMRC: Gujarat Metro Rail Corporation Limited)  166 कोटी रुपयांचा प्रकल्प मिळाला आहे. या प्रकल्पामध्ये सरठाणा ते ड्रीम सिटी या बॅलेस्टलेस ट्रॅकचे डिझायनिंग, इन्स्टॉलेशन, पुरवठा, चाचणी आणि कामाचा समावेश आहे. रेल विकास निगमने बीएसई फाइलिंगमध्ये म्हटले आहे की त्यात सुरत मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या फेज-1 च्या कॉरिडॉर-1 साठी बॅलेस्टलेस/बॅलेस्टलेस/एम्बेडेड स्टँडर्ड गेज ट्रॅकसह डेपोला जोडणाऱ्या लाईन्सचा देखील समावेश असेल. हा प्रकल्प 22 महिन्यांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

रेल विकास निगम, त्यांच्या सहाय्यक कंपन्या आणि संयुक्त उपक्रम रेल्वे मंत्रालयाने (MoR: Ministry of Railways) सोपवलेल्या विविध प्रकारच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या अंमलबजावणीच्या व्यवसायात गुंतलेले आहेत, ज्यात दुहेरीकरण म्हणजे 3री/4थी लाईनसह, गेज रूपांतरण, नवीन लाईन्स, रेल्वे विद्युतीकरण, रेल्वे मंत्रालयासोबत सवलतीच्या करारानुसार प्रमुख पूल, कार्यशाळा, उत्पादन युनिट्स आणि रेल्वेसह मालवाहतूक महसूलाची वाटणी आदी बाबी आहेत.

रेल विकास निगमचे प्रमुख ग्राहक भारतीय रेल्वे आहेत आणि इतर ग्राहकांमध्ये केंद्र आणि राज्य सरकारची विविध मंत्रालये, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचा समावेश आहे. रेल विकास निमगने स्पर्धात्मक बोलीद्वारे मेट्रो, महामार्ग आणि इतर पायाभूत सुविधा क्षेत्रातही सहभाग घेणे सुरू केले आहे.

गेल्या तीन महिन्यांत, रेल विकास निगमच्या शेअरची किंमत एसअँडपी, बीएसई सेन्सेक्समधील 3.7 टक्क्यांच्या वाढीच्या तुलनेत दुप्पट म्हणजे 114 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.