Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Multibagger Stock: या स्मॉल कॅप शेअरने, गुंतवणुकदारांना मिळवून दिला 1600 टक्के परतावा!

R&B Denim Stocks returned 87 times

Profit Gainer Stock: या कंपनीच्या शेअरने अभूतपूर्व कामगिरी करत, गुंतवणुकदारांना खूश केले आहे. या स्मॉल कॅप शेअरने 1 हजार 600 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. या शेअरबाबतचे संपूर्ण तपशील पुढे बातमीमध्ये वाचा.

The stock has returned 87 times to investors: सूचीबद्ध कंपन्या त्यांच्या गुंतवणूकदारांसाठी अनेक अवॉर्ड आणि रिवॉर्ड जाहीर करतात. कंपनी तिच्या 
राखीव भांडवलातून (capital reserve) अतिरिक्त लाभ देते. ज्यामध्ये शेअर्सची बायबॅक, लाभांश (अंतरिम, अंतिम किंवा विशेष), बोनस शेअर्स इश्यू करते. आपण ज्या स्टॉकबद्दल बोल आहोत, त्याने 87 पटीने गुंतवणुकदारांना परतावा मिळवून दिला.

आर अँड बी डेनिम (R&B Denim) कंपनीच्या  शेअर्सच्या किमतीचा इतिहास पाहता, गेल्या सात वर्षांत, या स्मॉल-कॅप स्टॉकने 2.25 रुपयांवरुन, प्रति शेअर 39 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत 1 हजार 600 टक्क्यांहून अधिक या स्टॉकची वाढ नोंदवण्यात आली आहे. तथापि, स्टॉक विभाजन ऑक्टोबर 2021 मध्ये झाले. ज्याने दीर्घकालीन गुंतवणूकदारांना केवळ सात वर्षांत 87 पट परतावा दिला.

R&B डेनिम्स स्टॉक स्प्लिट इतिहास (R&B Denims Stock Split History)

आर अँड बी डेनिम कंपनीच्या स्मॉल-कॅप स्टॉकने 28 ऑक्टोबर 2021 रोजी स्टॉक 1:5 च्या प्रमाणात विभाजित केला होता, म्हणजे विभाजनानंतर एका समभागधारकाचा एक हिस्सा पाच झाला. कंपनीने 10 रुपये प्रति इक्विटी शेअरच्या दर्शनी मूल्यावरून 2 रुपये प्रति इक्विटी शेअर असे त्याचे शेअर्स उप-विभाजित केले होते.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने जानेवारी 2016 च्या मध्यात या स्मॉल-कॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक केली असती, तर त्याला प्रति शेअर 2.25 या दराने कंपनीचे शेअर्स मिळाले असते. परंतु, 1:5 च्या प्रमाणात शेअर विभाजित झाल्यानंतर कंपनीतील शेअरहोल्डिंग पाच पटीने वाढले असते. त्यामुळे, जर एखाद्या गुंतवणूकदाराने सात वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाखाची गुंतवणूक केली असती, तर त्याला कंपनीचे 44 हजार 444 शेअर्स मिळाले असते. ऑक्टोबर 2021 मध्ये 1:5 स्टॉक स्प्लिटनंतर, एखाद्याचे 44 हजार 444 शेअर्स 2 लाख 22 हजार 220 शेअर्सपर्यंत वाढले असतील.

आज बीएसईवर (BSE: Bombay Stock Exchange) आर अँड बी डेनिमच्या शेअरची किंमत 39 रुपये असल्याने, एखाद्याच्या 1 लाखाची किंमत आज अंदाजे 87 लाख झाली असती. जर गुंतवणूकदाराने आजपर्यंत स्क्रिपमध्ये गुंतवणूक केली असेल. कंपनीचे सध्याचे बाजार भांडवल 272 कोटी आहे. या लघु आणि मध्यम आकाराचे उद्योगाचा (SME: Small and medium-sized enterprise) स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 92.45 रुपये आहे, तर 52-आठवड्याचा नीचांक 38.10 रुपये आहे.