क्वांट म्युच्युअल फंडांच्या (Quant Mutual Fund) क्वांट टॅक्स प्लॅन (Quant Tax Plan) या योजनेने गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS) या म्युच्युअल फंड श्रेणीत क्वांट टॅक्स प्लॅन ही योजना 40% रिर्टन्ससह अव्वल गुंतवणूक योजना ठरली आहे. मागील तीन वर्षात या योजनेतील डायरेक्ट प्लॅनमधून गुंतवणूकदारांना तब्बल 43.10% परतावा मिळाला तर रेग्युलर प्लॅनमधून 40.38% रिटर्न मिळाले आहेत.
क्वांट टॅक्स प्लॅनमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांनी केवळ संपत्ती निर्मितीच नाही केली तर कर बचतीचा देखील लाभ घेतला आहे. इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)मध्ये गुंतवणूक केल्यास करदात्याला दरवर्षी 'आयकर कलम 80 सी'नुसार 150000 रुपयांची कर वजावट मिळते.
म्युच्युअल फंड कॅल्युरेटरनुसार क्वांट टॅक्स प्लॅनच्या डायरेक्ट प्लॅनमध्ये दर महिन्याला 10000 रुपयांची एसआयपी सुरु केली असती तर तीन वर्षांत ही फंडातील एकूण रक्कम 7.37 लाख रुपये इतकी वाढली असती. तीन वर्षांसाठी दर महिन्याला 5000 रुपयांची एसआयपी सुरु केली असती तर ही फंडातील एकूण रक्कम 3.7 लाख रुपये इतकी वाढली असती.
क्वांट टॅक्स प्लॅनच्या दोन्ही योजनांनी तीन वर्षात सरासरी 40% रिटर्न्स दिला आहे. ईएलएसएस फंडांच्या श्रेणीत क्वांट टॅक्स प्लॅन परताव्याच्या बाबतीत आघाडीची गुंतवणूक योजना ठरली आहे. यातील रेग्युलर प्लॅनने 5 वर्ष मुदतीसाठी सरासरी 21.93% वार्षिक परतावा दिला. 10 वर्ष मुदतीसाठी या योजनेचा रिटर्नस 20.37% इतका होता.
क्वांट टॅक्स प्लॅन योजनेचा समावेश हाय रिस्क गटात
व्हॅल्यू रिसर्चने क्वांट टॅक्स प्लॅन या योजनेला फाईव्ह स्टार रेटिंग दिले आहे. क्वांट टॅक्स प्लॅन ही एक ओपन एंडेड इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम मार्च 2000 मध्ये सुरु करण्यात आली होती. या योजनेचा समावेश हाय रिस्क गटात होतो. क्वांट टॅक्स प्लॅनमध्ये किमान 500 रुपयांची गुंतवणूक सुरु करता येते. दर महिन्याला यात 500 रुपयांची एसआयपी केली तर तीन वर्षांत यातील गुंतवणूक 37090 रुपये इतकी वाढू शकते.