Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pune Metro Update: पुणेकर खुश, देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकचा मान मिळाला पुणे शहराला

Deepest Metro Station

Image Source : http://www.financialexpress.com/

Puneri Swag: पुणेकरांचा स्वॅगच वेगळा असतो, हे आपण नेहमी ऐकतो. आता या पुणेकरांच्या स्वॅगमध्ये आणखी एक भर पडली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकाचा मान 'पुणे' शहराला मिळाला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुया.

Pune Metro: पुण्यात जे पिकते, ते देशात गाजते असे म्हटले जाते. त्यामुळे पुण्याच्या मेट्रोची चर्चा ही पुण्यातच नव्हे तर संपूर्ण देशात रंगत आहे. भले, ते पुणेरी टोमणे (Puneri Tomane) असो. मात्र आता पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे, देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकाचा मान ‘पुणे’ (Pune) शहराला मिळाला आहे. याविषयी अधिक माहिती पाहुयात.

पुणेला हा मान का मिळाला? (Why did Pune Get this Status)

सध्या पुण्यात मेट्रोचे काम जोरदार सुरू आहे. ही मेट्रो वनाज ते रामवाडी (Vanaj to Ramwadi) धावणार आहे. तर पिंपरी चिंचवड ते स्वारगेट (Pimpri to Swargate) या मेट्रोचेदेखील काम सुरू आहे. या दोन मेट्रोला एकत्र जोडणारा मार्ग हा शिवाजीनगर स्थानक असणार आहे. त्यामुळे शिवाजीनगर भूमिगत स्थानकाच्या कामाने आता वेग पकडला आहे. या स्थानकाची खोली जमिनीच्या 108.59 फूट खाली आहे. देशात कोणत्याही मेट्रो स्थानकाची खोली इतकी नाही. त्यामुळे ‘शिवाजीनगर’ (Shivaji Nagar) या स्थानकाला देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानकाचा मान मिळाला आहे.

कसे असणार शिवाजीनगर स्थानक? (How will Shivajinagar Station Be)

देशातील सर्वाधिक खोल स्थानकाचा रेकाॅर्ड शिवाजीनगर स्थानकने आपल्या नावावर केला आहे. या भूमिगत स्थानकाची खोली 108.59 फूट असून छत 95 फूट उंच आहे. या स्थानकात थेट सूर्यप्रकाश पोहोचेल अशा प्रकारची व्यवस्था करण्यात आला आहे. हे स्थानकाचे हे एक मुख्य वैशिष्टये आहे. कारण यापूर्वी असे कोणतेही स्थानक तयार करण्यात आले नाही. या मेट्रो स्थानकाला डेंगळे पूल, कामगार पुतळा व पुणे जिल्हा सत्र न्यायालय या मार्गाने प्रवाशांना चालण्यासाठी पादचारी व इतर वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. या स्थानकात आठ उदवाहक (Lift) व अठरा सरकते जिने (Elevator) बसविण्यात येणार आहे.  या स्थानकाचा एकूण परिसर 11.17 एकर असून प्रवाशांना येण्याजाण्यासाठी एकूण 7 दरवाजे असणार आहेत. तसेच यासाठी पार्किंगचीदेखील मोठी व्यवस्था करण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त या ठिकाणी बसस्टाॅपदेखील असणार आहे. अशा प्रकारे वनाज ते रामवाडी 16 किमी व पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट 17 किमीच्या मेट्रो प्रकल्पची सर्व कामे नियोजित वेळेत होणार असल्याचे सांगितले जात आहे.