शेअर मार्केटमध्ये (Share Market) दररोज कमाई करण्याच्या संधी असते. यामध्ये निवडक स्टॉक्स चांगली कामगिरी करतात. बाजार तज्ज्ञ राजेश पालविया यांनी 3 सर्वोत्तम असे मिड कॅप (Mid cap) समभाग निवडले आहेत. या समभागांमध्ये ज्युबिलंट इंग्रेव्हिया (Jubilant ingrevia), प्रेस्टिज इस्टेट (Prestige estate) आणि सेंच्युरी प्लाय (Century ply) या स्टॉकचा समावेश आहे. राजेश पालविया यांनी लॉंग टर्म, पोझिशनल आणि शॉर्ट टर्म असे तिन्ही समभाग निवडले आहेत. शेअर्सची खरेदी याच्यासह टार्गेट आणि ट्रिगरदेखील त्यांनी सांगितले आहेत. झी बिझनेसनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
दीर्घकाळासाठी सर्वात चांगली निवड
लाँग टर्मसाठी जुबिलंट इंग्रेव्हियावर व्यवहार करण्याचा सल्ला राजेश पालविया यांनी दिला आहे. ते म्हणाले, की स्टॉकमधल्या सुधारणांनंतर साप्ताहिक चार्टवर रिव्हर्सल फर्मेशन दिसून आलं आहे. शेअरमध्ये सुमारे 4 महिन्यांच्या एकत्रीकरणानंतर चांगला रिकव्हरी ट्रेड होताना दिसत आहे. अशावेळी सध्याच्या पातळीवरून शेअरमध्ये चांगला चढउतार पाहायला मिळू शकतो. स्टॉकवर दीर्घ मुदतीसाठी 515 ते 530 रुपये टार्गेट असेल. व्यापारासाठी स्टॉपलॉस 504 रुपये असेल.
विश्वासार्ह शेअर्सवरच खरेदीचा सल्ला
मार्केट एक्स्पर्टनी सेंच्युरी प्लायला पोझिशनल पिकसाठी निवडलं आहे. गेल्या 4 आठवड्यांत कंसोलिडेशन ब्रेक आउट पाहायला मिळत आहे. येत्या काळात आणि अल्पावधीत शेअरमध्ये ज्याप्रकारे चढ-उताराचे व्यवहार दिसत आहेत, त्यानुसारच शेअर खरेदीसाठीचे सल्ले दिले जातील, असं त्यांनी सांगितलं. पोझिशनल टार्गेट 670-680 रुपये असेल. 565 रुपयांचा स्टॉप लॉस यासाठी आहे.
रियल्टी स्टॉक घेणार भरारी
अल्प मुदतीसाठी गुंतवणूकदारांना प्रेस्टिज इस्टेटचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला जात असतो. या स्टॉकनं साप्ताहिक चार्टवर अनेक ब्रेकआउट्स पाहिले आहेत. स्टॉकचं अल्पकालीन लक्ष्य (शॉर्ट टर्म) 615 ते 620 रुपये आहे. तर स्टॉप लॉस सुमारे 520 रुपये असणार आहे, असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले, की रिअल इस्टेट क्षेत्रदेखील खूप चांगलं काम करत आहे.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)