प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी देशातील सर्वात मोठ्या हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी तुमाकुरू येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) च्या हेलिकॉप्टर कारखान्याचे लोकार्पण केले आहे. या दौऱ्यात पंतप्रधान विविध विकास उपक्रमांची पायाभरणी करणार आहेत. 'इंडिया एनर्जी वीक (IEW) 2023' मधील महत्वाच्या प्रकल्पाचे आज उद्घाटन केले गेले. ऊर्जा संक्रमण महासत्ता म्हणून भारताची वाढती शक्ती प्रदर्शित करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
सदर हेलिकॉप्टर कारखाना दरवर्षी सुमारे 30 हेलिकॉप्टर तयार करेल आणि टप्प्याटप्प्याने ते 60 आणि नंतर 90 पर्यंत हेलिकॉप्टरची निर्मिती करेल असे सांगण्यात आले आहे. LUH ची पहिली उड्डाण चाचणी यशस्वी झाली आहे. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (IMRH) सारख्या इतर हेलिकॉप्टरच्या निर्मितीसाठी येत्या काळात हा कारखाना सज्ज होणार आहे.
PM Modi inaugurated India's largest helicopter manufacturing factory of #HAL in Tumakuru, #Karnataka.
— Indian Aerospace Defence News (IADN) (@NewsIADN) February 6, 2023
It will initially produce LUH and then be augmented to produce helicopters such as #LCH and #IMRH. It will also be used for MRO of #LCH, #LUH, #ALH, and civil copters.#IADN pic.twitter.com/fWHG1jR5Sv
2016 मध्ये झाली होती पायाभरणी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दुपारी तुमकुरू येथे HAL हेलिकॉप्टर कारखान्याचे उद्घाटन केले, ज्याची पायाभरणी पंतप्रधानांनी स्वतः 2016 मध्ये केली होती. हा एक समर्पित ग्रीनफिल्ड हेलिकॉप्टर कारखाना आहे जो हेलिकॉप्टर उत्पादन क्षमता आणि त्याच्या अनुकूली यंत्रणांना चालना देईल. हा हेलिकॉप्टर कारखाना आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर निर्मिती सुविधा आहे आणि सुरुवातीला लाइट युटिलिटी हेलिकॉप्टर (LUH) तयार करेल. लाइट कॉम्बॅट हेलिकॉप्टर (LCH) आणि इंडियन मल्टीरोल हेलिकॉप्टर (IMRH) सारख्या इतर हेलिकॉप्टरच्या निर्मितीसह भविष्यात LCH, LUH, सिव्हिल ALH आणि IMRH ची दुरुस्ती करण्यासाठी कारखाना विस्तारित केला जाईल. भविष्यात सिव्हिल LUH च्या निर्यातीलाही कारखान्याला वाव आहे. हा कारखाना येत्या काळात संपूर्ण भारताला हेलिकॉप्टर पुरवठा करू शकणार आहे.
तीन टप्प्यात औद्योगिक टाउनशिप विकसित करण्यात येणार
तुमाकुरु इंडस्ट्रियल टाऊनशिपची पायाभरणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. राष्ट्रीय औद्योगिक कॉरिडॉर विकास कार्यक्रमांतर्गत तुमकुरू येथे तीन टप्प्यांत चेन्नई-बेंगळुरू इंडस्ट्रियल कॉरिडॉर अंतर्गत 8484 एकर क्षेत्रावर पसरलेली औद्योगिक टाउनशिप विकसित करण्यात आली आहे. तुमाकुरू येथील तिप्तूर आणि चिक्कनायकनहल्ली येथे दोन जल जीवन मिशन प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधान करणार आहेत. या कार्यक्रमाला जगभरातून 30 हून अधिक मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्यात 30,000 हून अधिक प्रतिनिधी, 1,000 प्रदर्शक आणि 500 वक्ते देखील असतील जे भारताच्या ऊर्जा भविष्यातील आव्हाने आणि संधी यावर चर्चा करतील.