Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PPF Investment: अल्पवयीन मुलांच्या नावाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीत गुंतवणूक करण्याचे फायदे जाणून घ्या

PPF Investment

Image Source : www.quora.com

PPF Investment: आई-वडील आपल्या मुलांच्या नावाने वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करून त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतात. 'सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी' योजनेत (Public Provident Fund) पालक अल्पवयीन मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकतात. अल्पवयीन मुलांच्या नावाने गुंतवणूक करण्याचे काय फायदे आहेत, जाणून घेऊयात.

भारत सरकारकडून चालवण्यात येणाऱ्या सार्वजनिक भविष्य निधी योजनेत (PPF) गुंतवणूक करून लाखो रुपयांचा फंड तयार करता येऊ शकतो. या योजनेत पालक मुलांच्या नावाने गुंतवणूक करून त्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकतात. ही योजना भारत सरकारने 1968 साली सुरू केली असून यातील 2019 च्या परिच्छेद 3 नुसार, कोणताही पालक किंवा कायदेशीर पालक अल्पवयीन मुलाच्या नावाने पीपीएफ (PPF) खाते उघडू शकतो. या योजनेत नियमित गुंतवणूक करून परतावा मिळवता येऊ शकतो. अल्पवयीन मुलांच्या नावाने पीपीएफ योजनेत गुंतवणूक करण्याचे खूप सारे फायदे आहेत. त्याबद्दल जाणून  घेऊयात.

अल्पवयीन मुलांच्या नावाने पीपीफ योजनेत गुंतवणूक करण्याचे फायदे जाणून घ्या

पीपीएफ योजनेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये (PPF) सर्वात जास्त व्याजदर देण्यात येत आहे. या योजनेत चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाते. सध्या या योजनेत 7.1 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. ही योजना EEE प्रवर्गातील आहे. या योजनेतील व्याजदर हा सरकारकडून त्रैमासिक आधारावर सुधारित केला जातो. या योजनेत 1 एप्रिल 1986 पासून 31 मार्च 1988 पर्यंत आणि 1 एप्रिल 1988 ते 31 मार्च 2000 पर्यंत 12 टक्के व्याजदर देण्यात येत होता.

लॉक-इन पिरियड जाणून घ्या

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजनेत (PPF) 15 वर्षाचा लॉक इन पिरियड (Lock in period) देण्यात आला आहे. पालक मुलांच्या नावाने यामध्ये गुंतवणूक करू  शकतात. मुलं 18 वर्षाचे झाल्यानंतर यातील गुंतवणूक सुरू ठेवायची की नाही हा निर्णय घेऊ शकते. यामध्ये जेवढ्या लवकर गुंतवणूक करता येईल,तितकाच फायदा मिळेल.यामध्ये सर्वसामान्य कुटुंबातील पालक देखील गुंतवणूक करू शकतात. किमान 500 रुपये, तर कमाल मर्यादा 1.5 लाख रुपये गुंतवता येतात. ही रक्कम सर्वसामान्य लोकांना परवडणारी आहे.

कर सवलतीचा मिळेल फायदा

ही योजना EEE प्रवर्गातील आहे. एका  कुटुंबात अनेक पीपीएफ (PPF) खाती उघडली जाऊ शकतात. या योजनेत वार्षिक 1.5 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर आयकर कलम 80 सी अंतर्गत कर सवलतीचा लाभ (Tax Free Benefits) घेता येतो.

Source: hindi.moneycontrol.com