तुम्ही देखील पोस्टात गुंतवणूक करत असल्यास तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण, केंद्र सरकारने पाच वर्षांच्या RD योजनेच्या आज म्हणजेच 30 सप्टेंबर 2023 ला संपणाऱ्या तिमाहीच्या व्याजदरात बदल केला आहे. ही योजना केंद्र सरकारच्या नऊ प्रकारच्या अल्प बचत योजनांपैकी एक आहे. आधी या योजनेत वार्षिक 6.5 टक्के दराने व्याज मिळत होता. आता या योजनेच्या व्याजदरात बदल करण्यात आला आहे.
आता मिळेल 6.7 टक्के व्याजदर
तुम्ही पोस्टाच्या कोणत्याही योजनेत गुंतवणूक करुन, चांगला रिटर्न मिळवू शकता. त्यामुळे बरेच नागरिक पोस्टाच्या योजनेत गुंतवणूक करायला पुढेच राहतात. आता केंद्र सरकारने शुक्रवारी, 29 सप्टेंबरला पाच वर्षांच्या RD म्हणजेच अल्प बचत योजनेत 20 बेसिस पॉईंट्सची वाढ करण्याची घोषणा केली आहे.
या योजनेवर मिळणारा व्याजदर या तिमाहीच्या शेवटपर्यंत 31 डिसेंबर 2023 पर्यंत दिला जाणार आहे. तसेच, आधी दिल्या जाणाऱ्या 6.5 टक्क्यांऐवजी आता 6.7 टक्के व्याजदर देण्यात येणार आहे. हा नवीन व्याजदर 1 ऑक्टोबरपासून लागू होणारा आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांना गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ ठरणार आहे.
या योजनांचे व्याजदर जैसे थे
केंद्र सरकारने शुक्रवारी दिलेल्या निवेदनात, फक्त अल्प बचत योजनेच्या व्याजदरात वाढ केली आहे. मात्र, बाकीच्या योजनेचे व्याजदर आधी जे होते. त्याच स्वरुपात मिळणार आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत (SCSS) 8.2 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) योजनेत 7.7 टक्के दिला जात आहे.
याशिवाय पीपीएफ (PPF) योजनेत 7.1 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. किसान विकास पात्र (KVP) योजनेत 7.5 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर सुकन्या समृद्धी योजनेसाठी 8 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. तसेच, बचत खात्यावर 4 टक्के व्याजदर दिला जात आहे.
सरकारने फक्त पाच वर्षांच्या RD साठीच व्याजदर वाढवला आहे. त्यामुळे तुम्हाला या तिमाहीत चांगला रिटर्न मिळवायचा असल्यास तुम्ही या RD मध्ये गुंतवणूक करु शकता. तसेच, या ठिकाणी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरु शकते.