पैशांचा व्यवहार करण्यासाठी बॅंकेत खाते असणे गरजेचे आहे. यामुळे तुम्हाला कुठूनही पैसे काढणे सहज होते. तसेच, बॅंकेच्या तुलनेत पोस्टात बचत खाते उघडल्यास, तुम्हाला पोस्टाच्या अनेक योजनांचा लाभ घेता येतो. याशिवाय बॅंकेसारखे मिनिमम बॅलन्स मेंटेन करण्याचे टेन्शन राहत नाही. तुम्ही फक्त 500 रुपयांत पोस्टात खाते उघडू शकता. चला तर मग अन्य फायदे जाणून घेऊया.
खाते कोण उघडू शकते?
तुम्ही स्वतः खाते उघडू शकता. याचबरोबर संयुक्त खाते ही उघडता येत असून यात फक्त दोघांचाच समावेश असेल. अल्पवयीनांसाठी खाते उघडण्याची सुविधा असून पालकांच्या देखरेखी खाली त्यांचे खाते उघडल्या जावू शकते. जर अल्पवयीनाचे वय 10 वर्षांपेक्षा जास्त झाल्यास त्याला त्याच्या स्वतःच्या नावावर खाते उघडता येते. तसेच, संयुक्त खाते उघडले असल्यास, दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला तर खाते दुसऱ्याच्या नावावर ट्रान्सफर होईल. तुम्ही एकदा खाते उघडल्यावर तुम्हाला संयुक्त खात्यात ते बदलता येणार नाही. जेव्हा तुम्ही खाते उघडाला तेव्हाच तुम्हाला नाॅमिनी डिटेल्स देणे आवश्यक असेल.
500 रुपयांत उघडा खाते
पोस्टात खाते उघडण्यासाठी तुम्हाला 500 रुपये भरावे लागणार आहेत. एकदा खाते उघडल्यानंतर तुम्हाला त्यात मिनिमम बॅलन्स ठेवायची गरज नाही. पण, खात्यात 500 रुपयांच्या वर आकडा न गेल्यास, तुम्हाला मेंटन्स चार्ज म्हणून वर्षाच्या शेवटी 50 रुपये द्यावे लागतात. तसेच, खात्यात रक्कम झीरो असल्यास, तुमचे खाते आपोआप बंद होईल. खात्यातून पैसे काढायचे असल्यावर तुम्ही कमीतकमी 50 रुपये काढू शकता. तसेच, बचत खात्यात जमा केलेल्या पैशांवर तुम्हाला 4 टक्के व्याज मिळेल.
‘या’ आहेत इतर सुविधा
कोणत्याही बॅंकेत बचत खाते उघडल्यावर बऱ्याच सुविधा मिळतात, तश्याच पोस्टातही सुविधा आहेत. तुम्ही खाते उघल्यावर बॅंकेकडून तुम्हाला चेक बुक, एटीएम कार्ड, ई-बॅंकिंग, आधार लिंकिंग या सुविधांचा लाभ सहज घेता येते. याचबरोबर तुम्ही अटल पेन्शन योजना, प्रधान मंत्री सुरक्षा विमा योजना आणि प्रधान मंत्री जीवन ज्योती विमा योजनेचाही लाभ घेऊ शकता. याशिवाय तुम्हाला पोस्टाच्या पेमेंट बॅंकेत खाते उघडायचे असल्यास, फक्त 149 रुपये खर्च येतो. पण, त्यासाठी तुमचे पोस्टात खाते असणे आवश्यक आहे. तेव्हाच तुम्ही पेमेंट्स बॅंकेचा लाभ घेऊ शकता.