अर्थ मंत्रालयाच्या (Finance Ministry) या बदलांतर्गत 5 वर्षांची आवर्ती ठेव अधिक आकर्षक करण्यात आली आहे. सरकारनं या योजनेच्या व्याजदरात तब्बल 30 बेसिस पॉइंट्सनं वाढ केली आहे. आता पोस्ट ऑफिसच्या आवर्ती ठेवीवर 6.2 टक्क्यांऐवजी 6.5 टक्के व्याज मिळणार आहे. याशिवाय, 1 वर्ष, 2 वर्षांच्या मुदत ठेवींवरच्या व्याजदरात 10 आधार अंकांची वाढ करण्यात आली आहे.
Table of contents [Show]
1 जुलै 2023पासून नवे व्याजदर
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिटवचे नवीन व्याज दर 1 जुलै 2023पासून लागू झाले आहेत. याचा कालावधी 30 सप्टेंबर 2023पर्यंत असणार आहे. ही एक अशी योजना आहे, जी मध्यम मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त ठरणार आहे. 6.5 टक्के व्याज वार्षिक उपलब्ध आहे. मात्र याची गणना तिमाही चक्रवाढीच्या आधारे केली जाते. किमान 100 आणि त्यानंतर 100 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम जमा करण्याची मुभा असणार आहे. बँक व्यतिरिक्त पोस्ट ऑफिसची आवर्ती ठेव फक्त 5 वर्षांच्या कालावधीसाठी असते. ही मुदत नंतर पुन्हा 5 वर्षांसाठी वाढवता येते. मुदतवाढीदरम्यान मात्र केवळ जुने व्याजदर उपलब्ध असणार आहेत.
10 हजार जमा केल्यावर मिळतील 7.10 लाख
पोस्ट ऑफिस आरडी कॅल्क्युलेटरनुसार, समजा एखाद्या गुंतवणूकदारानं महिन्याला 10 हजार रुपये जमा केले तर पाच वर्षानंतर त्याला 7 लाख 10 हजार रुपये मिळतील. त्याचे एकूण ठेव भांडवल रुपये 6 लाख असेल आणि व्याजाची रक्कम सुमारे 1 लाख 10 हजार रुपये इतकी असेल.
हफ्ता जमा करण्याची प्रक्रिया
तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये रिकरिंग डिपॉझिट खातं उघडायचं असेल तर सांते 1 ते 15 तारखेच्या दरम्यान उघडावे लागेल. प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेपर्यंत त्यात रक्कम जमा करावी लागणार आहे. 15 तारखेनंतर समजा खातं उघडणार असाल तर प्रत्येक महिन्याच्या शेवटी हप्ता जमा करावा लागणार आहे.
एका दिवसाच्या घाईनं मोठं नुकसान?
योजना सुरू असताना जवळपास 12 हप्ते जमा केल्यानंतर तुम्हाला कर्जाची सुविधादेखील उपलब्ध होते. व्याजाचा दर आरडी खात्याच्या व्याजदरापेक्षा 2 टक्के अधिक असणार आहे. 5 वर्षापूर्वी एक दिवस जरी खातं बंद केलं तर फक्त बचत खात्यावरच्या व्याजाचाच लाभ मिळेल. सध्या बचत खात्यावरचा व्याजदर 4 टक्के आहे.