आजकाल महागाई वाढलीय. त्यामुळे 10, 20 किंवा 100-200 रुपये आपल्याकडे असून चालत नाही. अल्पबचतीच्या योजनाही फारशा दिसत नाहीत. मात्र छोट्या छोट्या बचतीतूनही आपली स्वप्ने पूर्ण होतात. दररोज 200 रुपये वाचवले तरी महिन्याला 6000 रुपयांची बचत होते. पण याच 6000 रुपयांचे 1 कोटी झाले तर? ऐकायला काहीतरी वेगळं वाटेल. पण शक्य आहे. दररोज तुम्ही 200 रुपये वाचवता आणि दर महिन्याला ते सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीसारख्या (PPF) योजनेत गुंतवता. त्यातून 20 वर्षांनंतर तुमच्याकडे जवळपास 32 लाख रुपये असतील. पीपीएफ ही दीर्घकालीन आणि सुरक्षित बचत योजना आहे. या योजनेत 7.1 टक्के वार्षिक चक्रवाढ दरानं व्याज मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला जर कोटींची उड्डाण घ्यायची असतील, तर नेमकी योजना आहे तरी काय? यातून कसं करोडपती होता येईल, याविषयी सविस्तर जाणून घेऊ...
Table of contents [Show]
पीपीएफमध्ये गुंतवणूक करा आणि मिळवा फायदे
पोस्ट ऑफिसमध्ये सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खातं उघडता येवू शकतं. यासाठी 500 रुपयेदेखील पुरेसे आहेत. यातून तुम्ही वार्षिक 1.50 लाख रुपये जमा करू शकता. ही रक्कम करमुक्त आहे. यासाठीची मॅच्युरिटी ही 15 वर्षे आहे. मात्र मॅच्युरिटीनंतर 5-5 वर्षांच्या कालावधीसाठी ती आणखी वाढविली जाऊ शकते. जर रोज 200 रुपये वाचवले तर दर महिन्याला 6000 रुपये वाचतील. आता प्रत्येक महिन्याला पीपीएफच्या खात्यात हे 6000 रुपये टाकावे. 20 वर्षांपर्यंत असं करावं. त्यानंतर मॅच्युरिटीवर तुम्हाला 31 लाख 95 हजार 984 रुपये मिळतील. 7.1% वार्षिक व्याज गृहीत धरून हे गणित केलंय. व्याजदराच बदल केल्यास मॅच्युरिटी रक्कम बदलू शकते. प्रत्येक तिमाहीत व्याजाचं पुनरावलोकन केलं जातं.
कसा मिळवता येईल लाभ?
तुमचं वय 25 आणि मासिक उत्पन्न 30-35 हजार आहे असं गृहीत धरल्यास सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये तुमच्यावर फारशी जबाबदारी नसते. त्यामुळे दररोज 200 रुपये वाचवणं सोपं जातं. 20 वर्षांचा कालावधी आपण गृहीत धरला आहे. तुम्ही 45 वर्षांचे व्हाल तेव्हा तुम्हाला पीपीएफमधून सुमारे 32 लाख रुपयांचा निधी मिळू शकतो. याचे अनेक फायदेही तुम्हाला मिळणार. कर बचत करण्यासाठीचा सर्वात मोठा फायदा मिळेल. कारण पीपीएफमध्ये वार्षिक 1.50 लाख रुपयांच्या ठेवींवर 80C अंतर्गत करात सूट मिळू शकते. मॅच्युरिटी आणि व्याजाचं उत्पन्नही यामध्ये करमुक्त आहे.
चक्रवाढ व्याजाचा परिणाम
दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत PPF खात्यात जी रक्कम असेल त्या रकमेवर व्याज जोडलं जातं. त्यामुळे महिन्याची 5 तारीख लक्षात ठेवावी. यापूर्वीच मासिक रक्कम भरावी. यानंतर खात्यात पैसे आल्यास 5 तारखेपूर्वी खात्यात जमा केलेल्या रकमेवर व्याज जोडलं जाईल. पीपीएफची मॅच्युरिटी 15 वर्षांची आहे. महिन्याला जास्तीत जास्त 12,500 रुपये जमा करता येऊ शकतात. यातून वर्षाला 1.5 लाख रुपये जमा होतील. दर महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मुदतपूर्ती होईपर्यंत 12500 रुपये भरावे लागतील. वार्षिक व्याज 7.1 टक्क्यानुसार, मॅच्युरिटीवर एकूण मूल्य 40,68,209 रुपये असेल. पीपीएफ खातं मॅच्युरिटीनंतर पाच-पाच वर्षांनी वाढवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. म्हणजे पुढचे दहा वर्ष ते चालू राहिल्यास तुमची गुंतवणूक चक्रवाढ व्याजासह 1.03 कोटी रुपये होईल.
असं आहे गणित...
- पीपीएफच्या मॅच्युरिटीवर तुम्हाला किती मिळतील?
- कमाल मासिक ठेव : रु 12,500
- व्याज दर : वार्षिक 7.1 टक्के
- 15 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम : 40,68,209 रुपये
- एकूण गुंतवणूक : रु. 22,50,000
- व्याज लाभ : रु. 18,18,209
- पोस्ट ऑफिसमध्ये 1 कोटी कसे?
- कमाल मासिक ठेव : रु 12,500
- व्याज दर : वार्षिक 7.1 टक्के
- 25 वर्षांनंतर मॅच्युरिटीवर रक्कम : 1.03 कोटी रुपये
- एकूण गुंतवणूक : रु.37,50,000
- व्याज लाभ : रु. 65,58,015