Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Post office scheme : चांगल्या परताव्यासह पैसे सुरक्षित, करातही सूट; काय आहे पोस्ट ऑफीसची योजना?

Post office scheme : चांगल्या परताव्यासह पैसे सुरक्षित, करातही सूट; काय आहे पोस्ट ऑफीसची योजना?

National Savings Certificate : चांगला परतावा देतानाच करमुक्त असलेली एक योजना पोस्ट ऑफीसनं आणली आहे. या योजनेतली गुंतवणूक एक सुरक्षित गुंतवणूक असल्याचं दिसून येतंय. पोस्ट ऑफीसच्या विविध योजना या सुरक्षित गुंतवणूकच नाही, तर फायद्याची गुंतवणूक म्हणूनही पाहिल्या जातात. त्यातल्याच एका योजनेची माहिती याठिकाणी पाहुया...

चांगल्या व्याजासह हा परतावा

सुरक्षित गुंतवणुकीकडे सर्वांचाच ओढा असतो. बँका, विविध वित्तीय संस्था अशा विविध योजना राबवत असतात. पोस्ट ऑफीसदेखील (Post office) विविध बचत, गुंतवणुकीच्या योजना राबवतं. चांगला परतावा देण्यासोबतच एक सुरक्षितता या माध्यमातून मिळते. ही योजना म्हणजे नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना (NSC) होय. यातल्या  ठेवीवर सरकारकडून हमी दिली जाते. या योजनेचा परतावा तर तांगला मिळतोच मात्र त्यावर करही लागत नाही. मॅच्युरिटीवर (Maturity) चांगल्या व्याजासह हा परतावा मिळतो. ही एक पारंपरिक गुंतवणुकीची पद्धत आहे. मात्र मिळणारे फायदे भरपूर आहेत. त्यामुळेच गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफीस हा एक उत्तम पर्याय ठरत आहे.

एकापेक्षा अधिक खाती

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेत गुंतवणुकीची मर्यादा नाही. एकापेक्षा अधिक खातीदेखील उघडता येवू शकतात. 1.5 लाख रुपयांपर्यंत करामध्ये सूट मिळू शकते. तर विशेष बाब म्हणजे, गुंतवणुकीवर खात्रीशीर चांगला परतावा मिळतो. साधारणपणे 5 लाखांची गुंतवणूक केल्यास त्यावर दोन लाखांचा परतावा मिळणार आहे. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (National Savings Certificate) ही केंद्र सरकारची अल्पबचत योजना आहे. या योजनेत आपल्याला एकाहून अधिक खाती काढता येतात.पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येईल. तर मॅच्युरिटीवर एकूण ठेव आणि व्याजाची रक्कम एकत्र देण्यात येते. निश्चित परतावा आहे, कारण सरकार हमी देतं, त्यामुळे पैसे बुडण्याची भीती बाळगण्याची गरज नाही.

गुंतवणुकीचं गणित काय?

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेत समजा तुम्ही 1000 रुपये ठेवले तर पाच वर्षांनी त्याच एक हजारच्या रकमेचे 1403 रुपये होतील. म्हणजेच 403 रुपयांचा परतावा तुम्हाला मिळतो. याचप्रमाणे पाच वर्षांच्या कालावधीसाठी जर तुम्ही 5 लाख रुपये जमा केले तर सात लाख रुपये तुम्हाला मिळतात. मॅच्युरिटीवर ही रक्कम मिळते. साधारणपणे 1000 रुपयांपासून तुम्हाला या योजनेत खातं उघडता येणार आहे. पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 2,01,276 रुपयांपर्यंत व्याज मिळते. त्यामुळे फायद्याची आणि चांगल्या परताव्याची ही योजना आहे. कोणत्याही जवळच्या पोस्ट ऑफीसमध्ये तुम्ही ही योजना सुरू करू शकता.

कोणासाठी फायद्याची?

वय वर्ष 10 पूर्ण केलेल्या कोणत्याही व्यक्तीसाठी ही योजना उपलब्ध आहे. दहा वर्षांच्या खालील मुलांसाठी मात्र केवळ त्यांचे पालकच खातं उघडू शकतात. पाच वर्षांचा कालावधी या योजनेसाठी आहे. मॅच्युरिटीच्या आत पैसे काढता येत नाहीत. एक हजार रुपयांपासून या योजनेत सहभागी होता येत असलं तरी गुंतवणुकीची कमाल मर्यादा नाही. त्यामुळे या नियमात शिथिलता असल्यानं इतर योजनांच्या तुलनेत या योजनेला मिळणारा प्रतिसाद चांगला आहे. महत्त्वाचं म्हणजे, खातं उघडल्यानंतर कुटुंबातल्या कोणत्याही सदस्याला या योजनेत नामनिर्देशित करता येवू शकतं. 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर करात सूट मिळते.

व्याज कसं?

नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत 7 टक्क्यांचं व्याज प्राप्त होतं. या व्याजावर चक्रवाढ लागू आहे. सहाजिकच तुम्हाला दरवर्षी व्याजावरच्या व्याजाचा लाभ मिळतो. दर तिमाहीत सरकार या व्याजाचा आढावा घेतं. प्रत्येक तिमाहीत व्याज भिन्न असू शकतं. मात्र दरवर्षी त्याची गणना केली जाते. मध्येच ही योजना बंद करता येत नाही. त्यामुळे परतावा हा फक्त मॅच्युरिटीवरच मिळतो.