पोस्ट ऑफिसच्या (Post Office) या योजनेचं नाव आहे मासिक उत्पन्न योजना (Post Office monthly income scheme - POMIS). ही सर्वात मोठ्या सरकारी गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. सर्व वयोगटातल्या गुंतवणूकदारांना (Investors) या योजनेत गुंतवणूक करणं पसंत आहे. याचं कारण निश्चित उत्पन्नाची (Income) हमी देणारा हा उत्तम पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला गुंतवणूकदाराच्या बचत खात्यात पैसे जमा होत असतात.
मूळ रकमेवर लाभ
या योजनेचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे एक तर तुम्हाला दर महिन्याला खात्रीशीर परतावा मिळत राहतो, निश्चित उत्पन्न येत राहतं तर दुसरं म्हणजे तुमची मूळ रक्कम... ही मूळ रक्कम आहे, ती सरकारी योजनेत सुरक्षित राहणार आहे. जेव्हा तुमची गुंतवणूक पाच वर्षांनी मॅच्युअर होईल, तेव्हा तुम्हाला तुमची संपूर्ण मुद्दलही परत मिळणार आहे.
पैसे दुप्पट करायचे कसे?
या योजनेच्या माध्यमातून पैसे दुप्पट करण्याचा लाभ तुम्हाला मिळू शकेल. तुमच्या बचत खात्यावर तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर तुम्ही दुहेरी लाभ घेऊ शकणार आहात. मासिक उत्पन्न योजनेंतर्गत तुम्हाला दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजातून आवर्ती ठेव उघडून तुम्ही यावर अधिक कमाई करू शकता. एका वर्षाच्या आरडीवर 6.9 टक्के व्याज दर तिमाहीत चक्रवाढ होणार आहे. म्हणजेच तुम्हाला व्याजावर व्याज मिळणार आहे. म्हणजेच काय तर नफ्यावर नफा मिळतो. याचा अर्थ तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली स्कीममध्ये 4.5 लाख रुपये गुंतवले असतील, तर तुम्हाला या योजनेअंतर्गत केवळ मॅच्युरिटीवरच व्याज मिळणार नाही, तर तुम्हाला रिकरिंग डिपॉझिट गुंतवणुकीचं व्याजही मिळणार आहे, म्हणजेच दुहेरी फायदा.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना - कॅल्क्युलेटर
- 5 लाख गुंतवणूक (मुद्दल) + [3,083 (दर महिन्याला व्याज जमा) x 60 महिने] = 6,84,980
- (5,00,000 + 1,84,980 व्याज)
- आवर्ती ठेव (6.9 टक्के व्याजानं) 60 महिन्यांसाठी (5 वर्षे)
- 60 महिन्यांसाठी 3,083 प्रति महिना म्हणजे 3,083 x 60 = 1,84,980
- 1,84,980 + 36,204 (व्याजातून कमाई) = 2,21,184