Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

POMIS Scheme:15 लाखांच्या गुंतवणुकीवर मासिक व्याज म्हणून मिळतील 9,000 रुपये; पोस्टाची ही योजना माहित आहे का?

Post IMS Scheme

Image Source : www.betterindia.com

Regular Income Scheme: भारतीय पोस्ट विभागाची एमआयएस (MIS) ही योजना बाजारातील जोखमींच्या अधीन नाही, त्यामुळे परतावा व गुंतवणूक केलेले पैसे हे संपूर्णपणे सुरक्षित असतात. 2023 च्या अर्थसंकल्पात या योजनेत गुंतवणुकीची कमाल मर्यादा वाढवण्यात आली होती.

देश व जगभरातील खाजगी रोजगाराची स्थिती लक्षात घेता भविष्यातील आर्थिक सुरक्षेसाठी गुंतवणूक ही खूप महत्वाची आहे. मात्र ही गुंतवणूक करतांना योग्य परताव्याची हमी मिळणे गरजेचे आहे. सरकार यासाठी सर्वात फायदेशीर व सुरक्षित मानल्या जातात. पोस्ट ऑफिसची मासिक गुंतवणूक योजना (Monthly Investment Scheme-MIS) तुम्हाला लाभदायी ठरते.  या योजनेबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया

काय आहे MIS ही योजना? (What is MIS Scheme?)

पोस्ट विभागाच्या या योजनेत एक व्यक्ती 9 लाख रुपयांची गुंतवणूक करू शकते. पण तीच व्यक्ती जॉईंट अकाऊंटच्या माध्यमातून 15 लाखांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. यापूर्वी ही गुंतवणूक मर्यादा फक्त 4.5 लाख रुपये होती. एकाच खात्यात गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारा 5,325 रुपये मासिक पेन्शन मिळेल. तर जॉईंट खात्यात 15 लाख रुपये गुंतवणूक केल्यास त्यावर मासिक व्याज 8,875 रुपये मिळतील. यामध्ये दोन्ही खातेदारांना समान वाटा मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासह या योजनेत गुंतवणूक करू शकता.

post office-2

कोण गुंतवणूक करू शकते? (Who can Invest?)

कोणताही प्रौढ भारतीय नागरिक यामध्ये गुंतवणूक करू शकतो. 10 वर्षांवरील मुलांच्या नावाने देखील खाते उघडू शकतात. या गुंतवणूकीवर 5 वर्षानंतर नियमित मासिक पैसे मिळू लागतात. यावर सरकार सध्या 7.1 टक्के व्याज देते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या योजनेत गुंतवलेले पैसे बाजारातील जोखमीच्या अधीन नाहीत. त्यामुळे तुमचे पैसे पूर्णपणे सुरक्षित असतील आणि तुम्हाला निश्चित उत्पन्न मिळेल.

गुंतवणूक करताना महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या

 • तुम्ही 1-3 वर्षांच्या दरम्यान गुंतवणुकीतून पैसे काढल्यास, जमा रकमेतील 2% कपात केली जाईल आणि परत केली जाईल.
 • तुम्ही एमआयएस खाते एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते. 
 • मॅच्युरिटी पूर्ण झाल्यावर योजना अजून 5 वर्षांसाठी वाढवली जाऊ शकते.  

मासिक उत्पन्न योजनेसाठी पात्रता (Eligibility for Monthly Income Scheme)

 पोस्ट विभागाचे एमआयएस (MIS) खाते उघडण्यासाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:

 •  तुम्ही भारताचे रहिवासी असणे आवश्यक आहे. 
 • 10 वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे अल्पवयीन मुले त्यांच्या नावावर खाते उघडू शकतात.  
 • 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या अल्पवयीन मुलांसाठी पालक खाते उघडू शकतात.  
 • जास्तीत जास्त तीन व्यक्तींसह जॉइन्ट खाते उघडता येते.  
 • एक पालक अस्वस्थ व्यक्तीच्या वतीने खाते उघडू शकतो.  


योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for the Scheme)

 एमआयएस खाते उघडण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.

 • योजनेचा अर्ज  
 • ओळखीचा पुरावा: आधार कार्ड/मतदार ओळखपत्र/पासपोर्ट  
 • पत्त्याचा पुरावा: नवीनतम युटिलिटी बिले/पासपोर्ट/पॅन कार्ड
 • पासपोर्ट साईज फोटो

मासिक उत्पन्न योजना उघडण्यासाठी, तुम्हाला जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी लागेल. अर्जासाठी विचारणा करून त्यात तपशील भरावा लागेल. यानंतर ओळख आणि पत्ता पुरावा कागदपत्रे सबमिट करावे. या प्रकारचे खाते उघडण्यासाठी अद्याप कोणतीही ऑनलाइन सुविधा नाही.