मासिक आधारावर आवर्ती ठेव योजनेत (Recurring Deposit Scheme) गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवता येतो, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. मात्र आवर्ती ठेव योजनेतील खाते पोस्ट ऑफिस (Post Office) आणि बँकेमध्ये (Bank) सुद्धा ओपन करता येते. सध्या केंद्र सरकारने छोट्या गुंतवणूक योजनांमधील व्याजदरात वाढ केली आहे. जर तुम्हालाही आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा मिळवायचा असेल, तर हे खाते पोस्ट ऑफिसमध्ये ओपन करावे की, बँकेमध्ये जाणून घेणे गरजेचे आहे. पोस्टातील आणि बँकेतील आवर्ती ठेव योजनेत मिळणाऱ्या व्याजदरात नक्की किती फरक आहे, जाणून घेऊयात.
Table of contents [Show]
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना
पोस्ट ऑफिसमधील (Post Office) सर्व गुंतवणूक योजना अधिक सुरक्षित आणि सर्वाधिक परतावा मिळवून देणाऱ्या आहेत. तुम्हालाही मासिक आधारावर गुंतवणूक करायची असेल, तर आवर्ती ठेव योजना हा एक उत्तम पर्याय आहे. केंद्र सरकारने छोट्या गुंतवणूक योजनांमधील व्याजदरात 0.30 टक्क्यांची वाढ केली आहे. त्यानंतर या योजनेत सध्या 6.5% व्याजदर दिला जात आहे. या योजनेचा गुंतवणूक कालावधी हा 1,2,3 आणि 5 वर्षाचा आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता.
एचडीएफसी बँक आवर्ती ठेव योजना
देशातील नामांकित एचडीएफसी बँकेमध्ये (HDFC Bank) आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करता येते. या बँकेत वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळा व्याजदर आकारला जात आहे. 6 महिन्यांच्या आवर्ती ठेव योजनेसाठी बँक 4.50% व्याजदर देत आहे. तर 9 महिन्यांसाठी 5.75% व्याज, 12 महिन्यांसाठी 6.60% व्याज आणि 15 महिन्यांसाठी 7.10% व्याज दिले जात आहे. एचडीएफसी बँक 24 महिन्यांपासून ते 120 महिन्यांच्या कालावधीतील गुंतवणुकीवर 7% व्याजदर देत आहे.
एसबीआय बँक आवर्ती ठेव योजना
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) आवर्ती ठेव योजनेमध्ये गुंतवणूक करता येते. ही बँक 1 वर्ष ते 2 वर्षाच्या आवर्ती ठेव गुंतवणुकीवर 5.10% व्याजदर देत आहे. तर 2 ते 3 वर्षांच्या गुंतवणुकीवर 5.20% व्याजदर देत आहे. तसेच 3 ते 4 वर्षांच्या आवर्ती ठेव योजनेतील गुंतवणुकीवर 5.45% व्याजदर दिला जात आहे. तर 5 ते 10 वर्षांच्या दीर्घकालीन गुंतवणुकीवर 5.50% सर्वाधिक व्याजदर दिला जात आहे.
येस बँक आवर्ती ठेव योजना
खाजगी क्षेत्रातील येस बँकेमध्ये (Yes Bank) देखील आवर्ती ठेव योजनेत गुंतवणूक करता येते. ही बँक ग्राहकांना 6 महिने ते 5 वर्षापर्यंतच्या किंवा त्याहून अधिकच्या काळासाठी केलेल्या गुंतवणुकीवर 6.10% ते 7.75% व्याजदर ऑफर करत आहे.
Source: hindi.moneycontrol.com