SUV आणि स्पोर्ट्स कार श्रेणींमध्ये पोर्श इंडियाने 2022 मध्ये 779 युनिट्सची विक्री केली. तसेच मागील वर्षी कंपनीने 474 युनिट्सची विक्री केली होती. वर्ष 2014 पासूनचे कंपनीचे कार निर्माता म्हणून भारतात विक्रीचे हे सर्वोत्तम आकडे आहेत.
भारतचं नव्हे तर संपूर्ण जगभरात स्पोर्ट्स कारचे एक वेगळे आकर्षण आहे. फरारी लंबॉर्गिनी व पॉर्श या स्पोर्टस् कारचे असंख्य चाहते आहेत. आकडे दर्शवितात की 2021 मध्ये पोर्श इंडियाने बाजारपेठेत केलेले उत्तम प्रदर्शन 2022 पर्यंत कायम ठेवले होते . SUV मॉडेल्सच्या विक्रीत 69% वाढीसह, पोर्श इंडियासाठी हे एक महत्वाचे वर्ष ठरले आहे.
पोर्शचे सर्वाधिक विकले जाणारे मॉडेल, पोर्श केयेनने 2022 या वर्षाच्या शेवटी 399 युनिट्सची विक्री केली. पोर्श इंडियाला 2022 मध्ये, बेंगळुरू, चेन्नई आणि कोलकाता येथे तीन नवीन पोर्श सेंटरचे भागीदार मिळाले, पोर्श कंपनीने ग्राहकांसाठी विविध उपक्रम राबविले यामुळे गग्राहकांना कंपनीने अधिक आकर्षित केले.
पोर्शने इलेक्ट्रिक टायकन केले सादर
पोर्श कंपनीचे ब्रॅंड डायरेक्टर मोनिलीतो वूजीकीक यांच्या म्हणण्यानुसार पोर्शने डिसेंबर 2021 मध्ये कंपनीचे इलेक्ट्रिक टायकन सादर केले. भारतातील लोकप्रियतेमुळे
वर्षभरातच 78 इलेक्ट्रिक सेडानची विक्री झाली. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला, पोर्शने भारतात 718 कायमॅन GT4 RS लॉंच केली. या कारची एक्स शोरूम किंमत
सुमारे 2.5 कोटी रुपये इतकी आहे.