POMIS Scheme: पोस्ट ऑफिस मासिक बचत योजनेमध्ये पती-पत्नी मिळून जॉईंट अकाउंट उघडू शकता. या योजनेतून पती-पत्नी प्रत्येक महिन्याला उत्पन्न मिळवू शकतात. या योजनेत दुहेरी लाभ मिळेल. 'पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना' (Post Office Monthly Savings Scheme) असे या योजनेचे नाव आहे.
योजनेचे स्वरुप
Post Office Monthly Savings Scheme मध्ये तुम्ही वैयक्तिक किंवा संयुक्त दोन्हीही खाते उघडू शकता. वैयक्तिक खाते उघडताना तुम्ही या योजनेत किमान रु 1,000 आणि कमाल 9 लाख रुपयापर्यंत गुंतवू शकता. संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये जमा करता येतात. तसेच एमआयएस या योजनेत दोन किंवा तीन लोक मिळून संयुक्त खाते उघडू शकता. या खात्याच्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न सर्वांना समान दिले जाते.
महत्वाची बाब म्हणजे एकल खाते कधीही संयुक्त खात्यात रुपांतरीत केले जाऊ शकते. तसेच संयुक्त खाते देखील एकल खात्यात रुपांतरीत केले जाऊ शकते. परंतु, खात्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यासाठी सर्व खाते सदस्यांना संयुक्त अर्ज द्यावा लागतो. यात तुमचे पैसे सुरक्षित असतात आणि व्याजदरही चांगला मिळतो. पोस्टात खाते उघडल्यानंतर 1 महिन्यांनी तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येतो.
लाभ काय मिळेल ?
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना, या योजनेत तुम्हाला जवळपास 7.4 टक्के दराने वार्षिक व्याज दिल्या जाते. योजनेअंतर्गत, तुमच्या एकूण ठेवीवरील वार्षिक व्याजानुसार परतावा मोजला जातो. यामध्ये तुमचा एकूण परतावा वार्षिक आधारावर असतो. प्रत्येक महिन्यानुसार 12 भागांमध्ये विभागला जातो. हा एक भाग तुम्ही तुमच्या खात्यात दर महिन्याला मिळवू शकता. जर तुम्हाला मासिक आधारावर या पैशांची गरज नसेल, तर तुम्ही ही रक्कम मुद्दलात जोडून व्याज आकारू शकता.
अशा पद्धतीने करा गुंतवणूक
समाजा, जर पती-पत्नीने या योजनेअंतर्गत संयुक्त खात्यात 9 लाख रुपये गुंतवले असतील. तर 7.4 टक्के व्याजदराने 9 लाख ठेवीवर वार्षिक परतावा 66,600 रुपये असेल. मासिक आधारावर पाहिल्यास 5550 रुपये मासिक फायदा होईल. तुम्ही दरमहा तुमच्या खात्यात मासिक 5550 रुपये मागवून घेऊ शकता. पाच वर्षानंतर तुम्हाला हे खाते बंद करता येते किंवा पुढेही सुरु ठेवता येते.