• 07 Dec, 2022 08:48

PNB Hike FD rates : पीएनबी बॅंकेच्या एफडी दरात वाढ, जाणून घ्या नवीन दर आणि मिळवा दुप्पट फायदा

PNB Housing Finance Bank Hike FD Rates

अनेक बँका त्यांचे फिक्स डिपॉझिटवरील दर, आरडी दर आणि बचत खात्याचे दर (Banks hike interest on FD, RD & Saving Bank) वाढवत आहेत. पीएनबी हाऊसिंग फायनान्स बॅंकेने (PNB Housing Finance Bank) सुद्धा आपल्या एफडीवरील व्याजदरात बदल केला आहे.

PNB Hike FD rates : रिझर्व्ह बँकेकडून (RBI) बँकांच्या फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ करण्याची प्रक्रिया सुरू केली. देशातील अनेक बँकांनी त्यांच्या एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली. यामध्ये फायनान्स कंपन्यांच्या नावांचाही समावेश करण्यात आला आहे. त्यात पीएनबी हाऊसिंग फायनान्स बॅंकेने (PNB Housing Finance Bank) आपल्या फिक्सड् डिपॉझिटवरील व्याजदरात वाढ केली. त्यानुसार बॅंकेने 7 ऑक्टोबरपासून एफडीच्या व्याजदरात 7 ते 7.40 टक्क्यांपर्यंत वाढ केली.

पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (PNB Housing Finance Limited) आणि नॅशनल हाऊसिंग बँक (National Housing Bank) सोबतच नोंदणीकृत हाऊसिंग फायनान्स कंपनीच्या 5 कोटींपेक्षा कमी दराच्या फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरात बदल करण्यात आला आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केल्यानुसार फिक्सड् डिपॉझिटचे नवीन दर 7 ऑक्टोबर 2022 पासून लागू झाले आहेत.

जाणून घ्या नवीन दर!

आता 12 ते 120 महिन्यांत पूर्ण होणाऱ्या फिक्स डिपॉझिटवर 7.00 ते 7.40 टक्केपर्यंत व्याजदर देण्यात येत आहे. पीएनबी, एचएफएल आता 36 ते 47 महिन्यांच्या कालावधीतील फिक्स डिपॉझिटवर जास्तीत जास्त 7.55 टक्के व्याज दर देत आहे. (New Rates on PNB Housing Finance)

पीएनबी हाउसिंग फायनान्सचे एफडी दर (PNB Housing Finance Fixed Deposit Rate)

12 ते 23 महिन्यांत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 7.00% व्याजदर ऑफर
24-35 महिन्यांत मुदतपूर्ती होणाऱ्या ठेवींवर, PNB हाउसिंग फायनान्स 6.80% व्याजदर देईल.
36-47 महिन्यांत मुदत ठेवींवर आता 7.55% व्याज मिळेल.
48-120 महिन्यांत पूर्ण होणाऱ्या ठेवींवर 7.40% व्याजदर मिळेल.

ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.25 टक्के अधिक व्याजदर

पीएनबी हाउसिंग फायनान्स लिमिटेड ज्येष्ठ नागरिकांसाठी (60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या) 0.25 टक्के अधिक व्याजदर देत आहे. पीएनबी हाऊसिंगच्या नियमांनुसार फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवलेली रक्कम मुदतीच्या आधी काढली जाऊ शकते. पण मग यावर दंड आकारला जाऊ शकतो. तीन महिन्यांच्या अनिवार्य लॉक-इन कालावधीनंतर फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतवलेली रक्कम काढता येते.

3 महिन्यानंतर कधीही पैसे काढता येऊ शकतात

पीएनबी हाऊसिंग फायनान्स बॅंकेने वेबसाईटवर नमूद केले की, “तुम्हाला तुमच्या फिक्स डिपॉझिट खात्यातून मुदतपूर्व पैसे काढण्याचा पर्याय उपलब्ध आहे. हा पर्याय पैसे ठेवल्याच्या दिवसापासून तीन महिन्यांनंतर केव्हाही वापरता येतो. ठेवींच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत मुदतपूर्व पैसे काढणाऱ्या व्यक्तींना वार्षिक 4 टक्के दराने व्याज दिले जाईल. सहा महिन्यांनंतर मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी, ज्या कालावधीसाठी ठेव ठेवली जाते. त्या कालावधीसाठी फिक्स डिपॉझिटवर लागू असलेल्या व्याज दरापेक्षा 1 टक्के कमी व्याजदर दिला जातो.