सार्वजनिक क्षेत्रातील पीएनबी बँकेने विशिष्ट मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाईटनुसार 666 दिवसांच्या ठेवींवरील व्याजदर 7.25% इतका करण्यात आला आहे. यापूर्वी त्यावर 6.30% व्याज मिळत होते. त्याचप्रमाणे तीन आणि 10 वर्ष मुदतींच्या ठेवींवरील व्याजदरात 0.40% ची वाढ करण्यात आली असून तो 6.50% केला आहे. यापूर्वी तो 6.10% होता.
बँकेने ज्येष्ठ ठेवीदारांना देखील व्याजदर वाढीचे गिफ्ट दिले आहे. ज्येष्ठांसाठीच्या ठेवीदरात पीएनबीने 0.50% वाढ केली आहे. दोन कोटींहून कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजदर वाढ करण्यात आल्याचे बँकेने म्हटले आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवींचा दर 4% ते 7.75% इतका आहे. 7 दिवसांपासून 10 वर्ष मुदतीच्या ठेवी आहेत.
बँकेने 666 दिसव मुदतीच्या ठेवीवरील व्याजदर थेट 7.75% इतका वाढण्यात आला आहे. यापूर्वी तो 6.80% होता. त्यात 0.95% वाढ करण्यात आली. तीन ते पाच वर्ष मुदत ठेवीवर आता ठेवीदारांना 7% व्याज मिळणार आहे. यापूर्वी 6.40% व्याजदर होता. पाच ते 10 वर्ष मुदतीसाठी व्याजदर 7.30% इतका मिळेल. त्यात 0.40% वाढ करण्यात आली.
बँकेने अतिज्येष्ठ श्रेणीतील ठेवीदांरांना देखील व्याजदर वाढीचा लाभ दिला आहे. सुपर सिनियर सिटिजन्सना 7 दिवस ते 10 वर्ष मुदतीसाठी ठेवींची योजना आहे. त्यावर 4.30% ते 8.05% व्याज दिले जाते.आता याच क्षेणीतील ठेवीदारांना 666 दिवसांसाठी 7.10% ते 8.05% व्याज दिले जाणार आहे. त्यात 0.95% ची वाढ झाली आहे. वय वर्ष 80 हून अधिक असलेले सुपर सिनियर सिटीझन्स ठेवीदारांना सर्वच ठेवींवर अतिरिक्त 0.80% व्याज दिले जाईल, असे बँकेने म्हटले आहे.