Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PMKVY: या सरकारी योजनेत तरुणांना मिळते हजारांची प्रोत्साहनपर रक्कम! अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या

PMKVY

Image Source : PMKVY

युवकांना रोजगाराभिमुख शिक्षण देण्यासाठी प्रधानमंत्री कौशल विकास योजना (PMKVY) 2015 मध्ये पंतप्रधान मोदींनी सुरू केली होती. या अंतर्गत तरुणांना बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग, हस्तकला आणि चर्मउद्योगाचे तंत्रज्ञान अशा सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रांचे प्रशिक्षण घेता येईल.

भारतातील नागरिकांच्या आणि पर्यायाने देशाच्या उन्नतीसाठी सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. देशातील बेरोजगारी कमी करण्यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (MSDE) अंतर्गत बेरोजगारी दूर करण्यासाठी अशीच एक योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे नाव प्रधान मंत्री कौशल विकास योजना (PMKVY) असून देशातील तरुणांना कौशल्यपूर्ण शिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याअंतर्गत तरुणांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते.

स्किल इंडिया मिशन (Skill India Mission) अंतर्गत ही योजना 2015 मध्ये सुरू करण्यात आली होती. 2022 पर्यंत या योजनेअंतर्गत देशातील विविध जिल्ह्यांतील कोट्यवधी तरुणांना कुशल बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

योजनेची खास वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या तरुणांना सरकारकडून सुमारे 8,000 रुपयांचे प्रोत्साहनपर रक्कम दिली जाते. यामध्ये वेगवेगळ्या विषयांसाठी तीन महिने, सहा महिने आणि एक वर्षासाठी अशा स्वरूपाची नोंदणी करावी लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर उमेदवाराला एक प्रमाणपत्र दिले जाते जे संपूर्ण देशात वैध आहे. प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर, एसएससी (SSC) मान्यताप्राप्त मूल्यांकन एजन्सीद्वारे मूल्यांकन केले जाईल. यामध्ये बांधकाम, इलेक्ट्रॉनिक्स आणि हार्डवेअर, फूड प्रोसेसिंग, फर्निचर आणि फिटिंग्ज, हस्तकला आणि लेदर टेक्नॉलॉजी अशी सुमारे 40 तांत्रिक क्षेत्रे देण्यात आली असून त्यामध्ये युवक प्रशिक्षण घेऊ शकतात.

योजनेचे काम तीन टप्प्यात सुरू

प्रधानमंत्री कौशल विकास योजनेचा पहिला टप्पा (PMKVY 1.0) 2015-16 साठी लागू करण्यात आला होता. या कालावधीत सुमारे 19.85 लाख लोकांना प्रशिक्षण देण्यात आले. 2016-20 मध्ये त्याचा दुसरा टप्पा राबविण्यात आला, ज्यामध्ये 1.2 कोटींहून अधिक तरुणांना रोजगाराभिमुख बनवण्यात आले आहे. यादरम्यान मेक इन इंडिया (Make in India), डिजिटल इंडिया (Digital India), स्वच्छ भारत (Swachh Bharat) यांसारख्या योजनांसह PMKVY 2.0 लाँच करण्यात आले. या योजनेचे बजेट 12 हजार कोटी रुपये ठेवण्यात आले होते. त्यानंतर 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत (Aatmnirbhar Bharat) या थीमसह तिसरा टप्पा सुरू करण्यात आला. त्याची व्याप्ती 28 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 717 जिल्ह्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

कसा कराल अर्ज?

तुम्ही प्रधानमंत्री कौशल विकास योजनेच्या अधिकृत वेबसाइट http://pmkvyofficial.org ला भेट देऊन स्वतःची नोंदणी करू शकता. येथे तुम्हाला नाव, पत्ता आणि ईमेल सारखी आवश्यक माहिती भरावी लागेल. तसेच, तुम्ही 8800055555 वर कॉल करून योजनेबद्दल अधिक माहिती मिळवू शकता.