Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

PM Modi's Jacket : पंतप्रधान मोदींचे जॅकेट फेकलेल्या बाटलीपासून आहे बनलेले, जाणून घ्या किंमत

PM Modi's Jacket

Image Source : https://navbharattimes.indiatimes.com/

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी बेंगळुरूमध्ये भारत ऊर्जा सप्ताहाचा (India Energy Week) शुभारंभ केला. यावेळी इंडियन ऑइलने त्यांना प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट भेट दिले. हे जॅकेट कसे बनवण्यात येते? आणि त्याची किंमत आज आपण पाहूया.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सोमवारी बेंगळुरूमध्ये भारत ऊर्जा सप्ताहाचा (India Energy Week) शुभारंभ केला. यावेळी इंडियन ऑइलने त्यांना प्लास्टिकच्या बाटल्यांचा पुनर्वापर करून तयार केलेले जॅकेट भेट म्हणून देण्यात आले. पेट्रोल पंप आणि एलपीजी एजन्सींवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी असा गणवेश बनवण्याची कंपनीची योजना आहे. त्याला अनबॉटल इनिशिएटिव्ह असे नाव देण्यात आले आहे. एक गणवेश बनवण्यासाठी एकूण 28 बाटल्यांचा पुनर्वापर केला जातो. कंपनीची दरवर्षी 100 दशलक्ष पीईटी बाटल्यांचे पुनर्वापर करण्याची योजना असून त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत तर होईल आणि पाण्याचीही मोठ्या प्रमाणात बचत होईल. कॉटनला रंग देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर केला जातो तर पॉलिस्टरला डोप डाईंग केले जाते. यामध्ये पाण्याचा थेंबही वापरला जात नाही. पीईटी बाटल्यांचा वापर करून सशस्त्र दलांसाठी नॉन-कॉम्बॅट युनिफॉर्म बनवण्याची आयओसीची योजना आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

आयओसीच्या या उपक्रमाचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, ग्रीन ग्रोथ आणि एनर्जी ट्रान्जिशनच्या दिशेने भारताचे प्रयत्न आपली मूल्ये प्रतिबिंबित करतात. सर्क्युलर इकॉनॉमी हा एक प्रकारे प्रत्येक भारतीयाच्या जीवनशैलीचा भाग आहे. ते म्हणाले की, 'रिड्यूस, रियुज आणि रिसायकल हा मंत्र आपल्या मूल्यांमध्ये आहे. याचेच एक उदाहरण आज येथे पाहायला मिळाले. दरवर्षी अशा 100 दशलक्ष बाटल्यांच्या पुनर्वापराचे उद्दिष्ट पर्यावरणाच्या संरक्षणासाठी खूप मदत करेल.

एका जॅकेटसाठी किती बाटल्या लागतात?

आयओसीने मोदींना सादर केलेल्या जॅकेटचे फॅब्रिक श्री रेंगा पॉलिमर्स या तामिळनाडूमधील करूर येथील कंपनीने बनवले आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार सेंथिल शंकर यांचा असा दावा आहे की त्यांनी पीईटी बाटल्यांपासून बनवलेले नऊ रंगांचे कपडे इंडियन ऑइलला दिले आहेत. यातून मोदींना चंदनाच्या रंगाचे जॅकेट देण्यात आले. गुजरातमधील टेलरने हे जॅकेट बनवले आहे. असे जॅकेट तयार करण्यासाठी सरासरी 15 बाटल्या वापरल्या जातात. एक संपूर्ण गणवेश तयार करण्यासाठी सरासरी 28 बाटल्या वापरल्या जातात.

जॅकेट बनवण्याची पद्धत आणि किंमत

प्लास्टिकच्या बाटल्यांपासून बनवलेल्या कपड्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याला रंग देण्यासाठी पाण्याचा थेंबही वापरला जात नाही. सेंथिलने सांगितले की, कापसाला रंग लावण्यात खूप पाणी वाया जाते. पण पीईटी बाटल्यांपासून बनवलेल्या कपड्यांमध्ये डोप डाईंगचा वापर केला जातो. प्रथम बाटल्यांपासून फायबर तयार केले जाते आणि नंतर त्यापासून सूत तयार केले जाते. सूत नंतर कापड बनवले जाते आणि शेवटी वस्त्र तयार केले जाते. रिसायकल केलेल्या बाटल्यांपासून बनवलेल्या जॅकेटची किरकोळ बाजारात किंमत 2,000 रुपये आहे.

कपड्यांवर आहे क्यूआर कोड

हे वस्त्र पूर्णपणे ग्रीन टेक्नॉलॉजीने बनवले आहे. या बाटल्या जमिनी आणि समुद्रातून गोळा केल्या जातात. सेंथिलने दावा केला की त्यांची कंपनी देशातील एकमेव कंपनी आहे जी एंड टू एंड काम करत आहे. आमच्या कपड्यांवर एक क्यूआर कोड आहे, जो स्कॅन करून तुम्ही त्याचा संपूर्ण इतिहास जाणून घेऊ शकता. कंपनी इंडियन ऑइलसोबत भागीदारीमध्ये काम करत आहे. टी-शर्ट आणि शॉर्ट्स तयार करण्यासाठी 5 ते 6 बाटल्या वापरल्या जातात. त्याचप्रमाणे शर्ट तयार करण्यासाठी 10 बाटल्या आणि पँट बनण्यासाठी 20 बाटल्या वापरल्या जातात.