• 02 Oct, 2022 10:01

पालकांचे छत्र हरवलेल्या मुलांसाठी 'पीएम केअर फॉर चिल्ड्रन फंड' योजना

government

कोरोनात पालक गमावलेल्या मुलांसाठी पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजेतील (PM Cares for Children Scheme) सुविधांची घोषणा पंत्रधान नरेंद्र मोदींकडून घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi)  सोमवारी दि.30 मे रोजी  सरकारने ८ वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्ताने  पीएम केअर फॉर चिल्ड्रन योजने अंतर्गत (PM Cares for Children Scheme) मिळणाऱ्या सुविधांच्या योजनांच्या दस्तऐवजाचे वितरण केले. या योजने अंतर्गत मुलांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. त्यासाठी आयुष्मान हेल्थ कार्डही (Ayushman Health Card) जारी करण्यात आलंय. विशेष म्हणजे, सरकारनं पीएम केअर्सच्या माध्यमातून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि उच्च शिक्षणासाठी मदत देणार असल्याचे जाहीर केले.

pm care for children fund scheme
 

शिक्षणाची जबाबदारी 

चिल्ड्रन केअर्स फॉर चिल्ड्रन फंडातून (PM CARES for Children) अनाथ मुलांच्या दैनंदिन गरजांपासून ते त्यांचा अभ्यास आणि आरोग्याची जबाबदारी घेतली जाणार आहे. या मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी घराजवळील कोणत्याही सरकारी किंवा खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. शाळेचा सर्व खर्च चिल्ड्रन केअर फंडातून पूर्ण केला जाणार आहे. या मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यावर संपूर्ण रक्कम मुलांच्या बॅंक खात्यात जमा करून, मुलांचे वय 23 वर्षांचे होईपर्यंत त्या रकमेतील एक विशिष्ट रक्कम मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येक महिन्याला दिली जाणार आहे. 

आयुष्मान हेल्थ कार्डद्वारे मोफत आरोग्य सेवा 

मुलांच्या आजारपणासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन्स (PM CARES for Children)च्या माध्यमातून  या मुलांना आयुष्मान हेल्थ कार्ड (Ayushman Health Card) दिलं जाणार आहे. या योजनेतून मुलांना 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य सेवा मोफत मिळणार आहे. आयुष्मान भारत योजना या प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत राबवली जाणारी केंद्र सरकारची एक आरोग्य योजना आहे. 1 एप्रिल, 2018 मध्ये ही योजना संपूर्ण भारतात लागू करण्यात आली होती.

महाराष्ट्रातील 790 मुलांना मिळणार लाभ

कोरोना काळात अनेक मुलांनी आपल्या पालकांचे छत्र गमावले आहे. अशी छत्र हरवलेली  मुले त्यांच्या नातेवाईकांवर किंवा इतर कोणावर तरी अवलंबून आहेत; अशा मुलांना आर्थिक आणि शैक्षणिक आधार (Financial and Educational Support) देण्यासाठी सरकारने ही योजना सुरु केली होती. 11 मार्च 2020 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीत आई-वडील दोघेही किंवा कायद्याने दत्तक आई-वडील गमावलेल्या मुलांना मदत करण्यासाठी पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेचा उद्देश मुलांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था करणं, त्यांना योग्य शिक्षण देणं आणि त्यांना एकूण आत्मनिर्भर करणं, हा आहे. 22 फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रातून 1438 मुलांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यातील 790 मुलांना या योजनेचा लाभ मिळाणार आहे.  

कोरोनामुळे आपले पालक गमावलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणावर अवलंबून राहावे लागू नये यासाठी सरकारने या योजनेला सुरूवात केली आहे. तसेच नवीन सुविधांचीही घोषणा केली आहे. सुविधांच्या अधिक माहितीसाठी https://pmcaresforchildren.in/ या संकेतस्थळाला भेट द्या.