Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Phone Pe - Flipkart Separation : फोन पे, फ्लिपकार्टपासून स्वतंत्र झाल्यामुळे काय फायदा होईल?

Phone Pe

Phone Pe - Flipkart Separation : फ्लिपकार्ट या भारतीय स्टार्टअप कंपनीने फोन पे या आपल्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीला आता स्वतंत्र दर्जा दिला आहे. आणि फोन पेच्या विस्ताराची योजनाही आखली आहे

फ्लिपकार्ट (Flipkart) आणि फोनपे (Phone Pe) या दोन आता स्वतंत्र कंपन्या असतील. त्यासाठीची प्रक्रिया फ्लिपकार्टने (Flipkart) पूर्ण केली आहे. आणि त्यानंतर फोन पेच्या (Phone Pe) विस्ताराच्या योजनाही उघड केल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या दिवसांत फोन पेसाठी पैसा गोळा करण्याची मोहीमही सुरू होईल. आणि ती यशस्वी झाली तर फोनपे देशातली सगळ्यात मोठी फिनटेक युनिकॉर्न (FinTech Unicorn) कंपनी बनेल.    

फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्ट सिंगापूर (Wallmart Singapore) कंपनीची मोठी गुंतवणूक होती. वॉलमार्टनेही आता स्वतंत्रपणे फोन पेमध्ये पुन्हा गुंतवणूक केली आहे. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात फोन पे कंपनीने आपली नोंदणी सिंगापूरमधून रद्द करून भारतात केली. आणि त्यामुळे फोन पे आता भारतीय कंपनी झाली आहे.    

फोन पेच्या विस्ताराची योजना How Phone Pe Will Expand?   

फोन पे ही कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक समीर निगम यांच्यासह राहुल चारी आणि बर्झिन इंजिनिअर यांनी एकत्रपणे उभी केली. 2015 मध्ये स्थापना झालेल्या या कंपनीचे 40 कोटी ग्राहक आहेत. युपीआय व्यवहारांमधली भारतातली ही एक आघाडीची कंपनी आहे. आणि युपीआय व्यवहारांती संख्या लक्षात घेतली तर त्यांचा बाजारपेठेतला हिस्सा 47% आहे. आता कंपनीला इतर क्षेत्रांमध्ये विस्तार करायचा आहे.    

‘आम्हाला आता विकासाचं पुढचं पाऊल टाकायचं आहे. आणि त्यासाठी गुंतवणूक, विमा, कर्ज अशा नवीन उद्योगांमध्ये शिरकाव करायचा आहे. त्याचबरोबर UPI व्यवहारांचा लोकांचा अनुभव आणखी अद्ययावत करायचा आहे,’ असं समीर निगम यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.    

आणि हे उद्योग स्वतंत्र असल्यामुळे गुतंवणूकदारांचा गोंधळ होऊ नये यासाठीच मूळ कंपनी असलेल्या फ्लिपकार्टमधून फोन पे नं तांत्रिक दृष्ट्या फारकत घेतलीय. त्यामुळे भावी गुंतवणूकदार फोन पेच्या उद्योग क्षेत्राचा विस्तार समजून घेऊन त्यात गुंतवणूक करू शकतील.    

सध्या वॉलमार्ट ही फोन पेमधली सगळ्यात मोठी गुंतवणूकदार कंपनी आहे. पण, इथून पुढे फोन पेला आपल्या विस्तारासाठी आणखी गुंतवणुकीची गरज आहे. त्यांना युपीआय पेमेंटसाठी स्वत:चा गेटवे तयार करायचा आहे. तसं झालं तर पेटीएम, रेझरपे आणि पाईन टॅब यांच्याबरोबरीने फोनपेता गेटवे भारतात तयार होऊ शकेल.    

आता फोन पेवर युपीआय पेमेंटच्या बरोबरीने तुम्ही सोनं, म्युच्युअल फंड आणि विमा यात गुंतवणूक करू शकता. हा उद्योग आता फोन पेला वाढवायचाय.