जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव सलग दुसऱ्या दिवशी वाढला. क्रूडचा भाव प्रती बॅरल 81 डॉलर प्रती बॅरलवर गेला. मात्र पेट्रोलियम कंपन्यांनी आज मंगळवारी 7 फेब्रुवारी 2023 रोजी इंधन दर जैसे थेच ठेवले. सलग नऊ महिने देशभरातील इंधन दर स्थिर आहेत.
आज मंगळवारी 7 फेब्रुवारी 2023 रोजी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 106.32 रुपये आणि डिझेलचा भाव 94.27 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव 96.72 रुपये आणि डिझेलचा भाव 89.62 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये असून चेन्नईत पेट्रोल दर 102.63 रुपये आणि डिझेलचा भाव 94.24 रुपये आहे.
रशिया आणि युक्रेन युद्धामुळे क्रूडमध्ये झालेल्या प्रचंड भाववाढीचा फटका पेट्रोलियम कंपन्यांना बसला होता. पेट्रोलियम कंपन्यांना 6.5 ते 7 बिलियन डॉलरचे नुकसान झाल्याचे बोलले जाते. हा तोटा भरुन काढण्यासाठी इंधन दर दीर्घकाळ जैसे थेच ठेवण्याची भूमिका कंपन्यांनी घेतल्याचे बोलले जाते. पेट्रोल,डिझेल,एलपीजी, सीएनजी यांचा दर आंतररराष्ट्रीय बाजाराशी संलग्न आहे. ज्यावेळी कमॉडिटी बाजारात क्रूडचा भाव वाढतो तेव्हा कंपन्या पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ करतात.
क्रूडचा भाव सलग दुसऱ्या दिवशी वाढला
जागतिक बाजारात क्रूडचा भाव सलग दुसऱ्या दिवशी वाढला. ब्रेंट क्रूडचा भाव 40 सेंट्सने वाढला आणि तो प्रती बॅरल 81.39 डॉलर इतका वाढला. वेस्ट टेक्सासमध्ये क्रूडचा भाव 43 सेंट्सचा भाव 74.54 डॉलर प्रती बॅरल इतका वाढला. चीनमधील कच्च्या तेलाची मागणी वाढत असल्याने तेलाचा भाव तेजीत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे.
नऊ महिन्यांपूर्वी इंधन दरात शेवटचा बदल झाला होता
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल 22 मे 2022 रोजी झाला होता. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईजमध्ये अनुक्रमे 8 आणि 6 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर भाजपशासित राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट करात कपात केली होती. महाराष्ट्रात देखील सत्तांतर झाल्यानंतर जुलै महिन्यात पेट्रोलवरील व्हॅटमध्ये 5 रुपये आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये 3 रुपयांची कपात केली होती.