Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: सलग सातव्या महिन्यात इंधन दर 'जैसे थे'! जाणून घ्या आजचा पेट्रोल-डिझेलचा दर

Petrol Diesel Price today in mumbai

Petrol-Diesel Rate Today In Mumbai: पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सात महिने पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतीत घसरण होत असली तरी भारतीयांना मात्र जादा दराने इंधन खरेदी करावी लागत आहे.

मागील आठवड्यात जागतिक कमॉडिटी बाजाराक क्रूडचा भाव कमी झाला असला तरी भारतीयांना मात्र स्वस्त इंधनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी आज सोमवारी 9 जानेवारी 2023 रोजी पेट्रोल आणि डिझेल दरात कोणताही बदल केला नाही. सलत सात महिने देशभरात पेट्रोल आणि डिझेलचा भाव जैसे थेच आहे. यातून पेट्रोलिमय कंपन्यांनी बक्कळ कमाई सुरु आहे.

आज सोमवारी मुंबईत एक लिटर पेट्रोलचा भाव 106.31 रुपये इतका आहे. एक लिटर डिझेलसाठी मुंबईत 94.27 रुपये मोजावे लागत आहे. यापूर्वी 21 मे 2022 रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत शेवटचा बदल झाला होता. केंद्र सरकारने महागाई कमी करण्यासाठी 
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलवरील उत्पादन शुल्क 8 रुपयांनी तर डिझेलवरी उत्पादन शुल्क 6 रुपयांनी कमी केले होते.

आज दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा भाव 96.72 रुपये इतका आहे. दिल्लीत डिझेलचा दर 89.62 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल दर 102.63 रुपये आणि डिझेलचा भाव 94.24 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेलचा भाव  92.76 रुपये इतका आहे. नोएडामध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 96.79 रुपये आणि डिझेलचा भाव  89.96 रुपये इतका आहे.

दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेल दर जाहीर होतो

पेट्रोलियम कंपन्यांनी 21 मे 2022 नंतर इंधन दर 'जैसे थे'च ठेवले आहेत. देशातील पेट्रोल, डिझेल, आणि घरगुती गॅस यांच्या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाशी संलग्न आहेत. त्यामुळे पेट्रोलियम कंपन्यांकडून दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलचा किरकोळ भाव जाहीर केला जातो. पेट्रोल आणि डिझेलवर वेगवेगळ्या प्रकारचे शुल्क आकारले जाते. यात सेंट्रल एक्साईज, व्हॅट हे कर आकारले जातात. त्यामुळे इंधन दर राज्यनिहाय वेगवेगळा आहे.