Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Penny Stocks: फ्यूचर ग्रुपचा Future Retail चर्चेत, 700 चा शेअर्स 3 रुपयात मिळतोय, पण ..

Future Group

Image Source : www.indiaretailing.com

शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या Penny Stock हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण यातला एखादा शेअर्स हा खूपच चकित करणारा परतावा देत असतो. असाच एक Penny Stock चर्चेत आला आहे. 700 वर ट्रेड करणारा हा Future Retail चा शेअर सध्या 3 रुपयाला मिळतो आहे.

Future Retail सध्या 3.18 रुपयांवर ट्रेड करत आहे. हा शेअर्स 700 रुपयांवर देखील पोचला होता. तारखेनुसार आजपासून 5 वर्षापूर्वी हा शेअर 511.50 रुपयांवर ट्रेड करत होता. मात्र या कालावधीत 508.32 रुपयांची म्हणजेच तब्बल 99.38 टक्के इतकी घट झाली आहे. एक वर्ष आधी 45.80  रुपयांवर हा शेअर्स होता. मात्र या कालावधीत तब्बल 93.06 टक्के इतकी घट झाली आहे. महिनाभरापूर्वीच्या किमतीच्या तुलनेतही 13.82 टक्के इतकी घट झाली आहे. Groww App वर याबाबतची आकडेवारी उपलब्ध आहे. 

सध्या हा स्टॉक चर्चेत का आहे? 

एकेकाळी 700 रुपयांवर असणारा हा शेअर्स सध्या 3.18 रुपयांना मिळतोय हे त्याच्या चर्चेचे सध्याचे महत्वाचे कारण आहे. Penny Stock चांगला कोणता आहे याकडे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांचे लक्ष असते. यात असा एखादा महाग शेअर्स इतक्या स्वस्तात उपलब्ध असतो, तेव्हा तो अनेकांना आकर्षित करत असतो. शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांच्या Penny Stock हा जिव्हाळ्याचा विषय असतो. कारण यातला एखादा शेअर्स हा खूपच चकित करणारा परतावा देत असतो. मात्र यामध्ये जोखीम देखील तेवढीच जास्त असते. 

स्वस्तात आहे म्हणून घ्यावा का? 

एखादा शेअर्स केव्हातरी खूप जास्त किमतीला मिळत होता आणि भविष्यात पुन्हा केव्हा तरी तो त्या किमतीला जाऊन पोचेल आणि आता तो  स्वस्तात मिळतो आहे, केवळ या निकषावर शेअर्स खरेदी करणे हे आदर्श मानले जात नाही. एखाद्या कंपनीचे शेअर्स जेव्हा गडगडतात त्यामागेही जी  काही कारणे असतात ज्यांचा विचार करणे आवश्यक असते. आणि जो शेअर्स 99 टक्क्यांनी घसरला आहे. तो आता जिथे आहे तिथूनही 99 टक्के आणखी घसरू शकतो, याचा देखील विचार करणे महत्वाचे असते. 

हजारो  कोटी रुपयांचे कर्ज 

फ्यूचर रिटेल ही future Group ची कंपनी आहे.  यांच्यावर एकूण 13 हजार 811 कोटी रुपयांचे कर्ज आहे. फ्यूचर रिटेलचे मार्केट कॅपिटल 168 कोटी रुपये इतके आहे. याचे 82.08 टक्के शेअर्सहोल्डींग रिटेल इन्व्हेस्टरकडे आहे. प्रमोटर्सकडे यांचे 14.31 टक्के इतकेच शेअर्स आहेत. या अगोदर हा वाटा 19.86 इतका हा वाटा होता.

कंपनी फॅशन प्रॉडक्ट, हाऊसहोल्डींग, कंज्यूमर प्रॉडक्टसह भारतातीत लार्जेस्ट रिटेलर म्हणून ओळखली जाते.  बिग बाजार चेन ही कंपनी ऑपरेट करते. प्रमोटर्सच आपल्या होल्डींगचे प्रमाण कमी करत आहेत ही  एक बाब आणि मोठे कर्ज हे या शेअर्सच्या नकारात्मक बाजू म्हणून पुढे येतात. मात्र कंपनीचा व्यवसाय चांगला सुरू आहे, ही त्याची जमेची बाजू मानली जाते. असाच नफा कायम राहिला किवा भविष्यात एखादा मोठा इन्व्हेस्टर यामध्ये सहभागी होणार आहे, अशा बातम्या आल्यास या शेअर्समध्ये वाढही बघायला मिळू शकते. 

सध्या हा स्टॉक स्वस्तात मिळतो आहे म्हणून चर्चेत असला तरी कोणताही स्टॉक खरेदी करताना त्याचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणे महत्वाचे ठरते. 

(डिसक्लेमर: शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. महामनी शेअर्स खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)