डिजिटल पेमेंटमधील PayPal या कंपनीने MetaMask या क्रिप्टो वॉलेट कंपनीसोबत करार केला आहे. यातून क्रिप्टोमध्ये गुंतवणूक करु इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरन्सी गुंतवणूक करण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
PayPal ही एक ऑनलाईन पेमेंट सुविधा पुरविणारी कंपनी आहे. PayPal ने ऑक्टोबर २०२० मध्ये आपल्या पेमेंट सुविधांमध्ये क्रिप्टो पेमेंट्सचा देखील समावेश केला होता. त्यामुळे PayPal क्रिप्टो संबंधी सकारात्मक असल्याचे दिसून येते. त्यांनी आता क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार म्हणजेच खरेदी करणे आणि विक्री करणे अधिकाधिक सोपे करण्यासाठी हा करार केल्याचे कंपन्यांनी सांगितले.
PayPal आणि MetaMask मधील डेव्हलपर ConsenSys हे एकत्र येऊन वापरकर्त्यांना इथेरियम (Etherium) विकत घेण्यासाठी त्यांच्या PayPal अकाउंटचा वापर करण्याचा ऑप्शन पुरविणार आहेत. ही संपूर्ण प्रोसेस MetaMask च्या अॅप वरून केली जाईल, ज्यामुळे इथेरियम विकत घेणं अगदी सोपं होणार आहे.
क्रिप्टो मार्केटमधील अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार क्रिप्टो मार्केट सोडून जात आहेत. त्यांना परत आणण्यासाठी मेटामस्कने हा प्रकल्प हाती घेतला आहे. ह्या प्रकल्पामुळे इन्वेस्टर्सचे लक्ष Web 3 इकोसिस्टिमकडे जास्त जाईल, ज्यामुळे मार्केटला थोडा दिलासा मिळू शकेल, असा विश्वास या कंपन्यांनी व्यक्त केला आहे.
मेटामस्कची ही नवी सुविधा सुरुवातीला केवळ अमेरिकेतील वापरकर्त्यांना दिली जाणार आहे. PayPal ने उचललेले हे पाऊल त्यांच्या क्रिप्टो वाटचालीतील महत्वाचे पाऊल आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये त्यांनी त्यांच्या प्लॅटफॉर्म वरून क्रिप्टो करन्सी विकत घेण्याचे व विकण्याचे नवे फेचेर्स लाँच केले होते व त्यानंतर त्यांनी MetaMask सोबतचा हा प्रोजेक्ट लाँच केला आहे. त्यामुळे भविष्यात PayPal क्रिप्टो मार्केट मध्ये काय करेल ह्याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.