Parveen Babi Death Anniversary: 20 जानेवारी 2005 रोजी अभिनेत्री परवीन बाबी (Parveen Babi) यांचे निधन झाले होते. पण अजून ही या अभिनेत्रीचे नाव प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. अतिशय मादक व बोल्ड अभिनेत्री म्हणून तिची इंडस्ट्रीमध्ये ओळख होती. तिने एकापाठोपाठ एक असे अनेक हिट चित्रपटदेखील दिले होते. आज या अभिनेत्रीला जाऊन 18 वर्षे होत आहे. या लोकप्रिय अभिनेत्रीचा शेवट फार चांगला झाला नाही. कारण या अभिनेत्रीचा मृत्यू होऊन तीन दिवस झाले होते, तरी तिचा मृतदेह घरात पडून होता. याची माहिती कोणालाही नव्हती. कारण ती घरात एकटीच राहत होती. तिला कोणी वारसदार नव्हते. तिने करोडोंची संपत्ती मागे सोडली. मात्र तिच्या या संपत्तीचे अखेर झाले काय हे जाणून घेवुयात.
तीन दिवस मृत्यू घरात पडून होता
परवीन बाबी या अभिनेत्रीला प्रचंड यश मिळाले होते. ती एक लोकप्रिय अभिनेत्री होती. पण तिचा दुर्देवी मृत्यू झाला होता. कारण यशाच्या उंचावर असताना तिला पॅरानाइड स्कित्जोफ्रेनिया हा गंभीर मानसिक आजार झाला होता. 1983 मध्ये ती सर्व सोडून परदेशात अध्यात्म गुरू यू.जी.कृष्णामूर्ती यांच्या अध्यात्माच्या मार्गावर गेली. परदेशात राहून ती साधारण 1989 ला परत आली. मात्र ती बिलकूल ओळखली गेली नाही. कारण वाढते वजनामुळे ती वेगळीच दिसत होती. तसेच न्यूयाॅर्क एअरपोर्टवर कागदपत्रे न दाखविल्याने ती तुरूंगात देखील पोहोचली होती. यादरम्याच तिच्या मानसिक आजाराची सुरूवात झाली होती. पैसा, प्रसिध्दी सर्व असतानादेखील फक्त एकटेपणामुळे तिला हा आजार उद्भवला होता. हा आजार तिला इतका बळावला की तिने जग सोडून गेली. तिच्या मृत्यूला तीन दिवस झाले तरी कुणाला कळाले नव्हते. ब्रेड व दुध तिच्या घराबाहेर तीन दिवस होते. कोणी ते न घेतल्यामुळे, शेजारच्या लोकांना संशय आला व त्यांनी पोलिसात कळविले.
संपत्तीचे काय झाले
परवीन बाबी यांच्याकडे जुहूमध्ये एक अलिशान प्लॅट होता. हा चार बेडरूमचा प्लॅट समुद्र किनाऱ्याजवळ होता. जुनागड या ठिकाणी हवेली, सोने, बॅंकेत 20 लाखाची एफडी व इतर पैसे अशी तिची संपत्ती होती. या संपत्तीचा वाद हा 11 वर्ष कोर्टात चालला होता. या वादावर अखेर पडदा पडला. तिच्या मृत्यूपत्राला कोर्टाकडून मंजूरी मिळाली आणि कोर्टाच्या आदेशानुसार, परवीन बाबीच्या संपत्तीचा 80 टक्के भाग गरजू महिला व मुलांच्या मदतीकरिता दिला गेला व 20 टक्के भाग हा तिच्या मामाला देण्यात आला.