Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pak Economic Crisis: पाकिस्तानला यावर्षी विदेशी कर्जदारांना 23 अब्ज डॉलर्सची करायची आहे परतफेड

Pakistan Economic Crisis

Image Source : www.inventiva.co.in

Pak Economic Crisis : खाद्यपदार्थांव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल, सिलिंडर गॅस, फळे, भाजीपाल्याचे दर सातव्या गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानी जनतेला दिलासा मिळताना दिसत नाये.पाकिस्तान सध्या कठीण काळातून जात आहे. यातच विदेशी कर्जाचे आव्हानही समोर दिसत आहे.

खाद्यपदार्थांव्यतिरिक्त पेट्रोल-डिझेल, सिलिंडर गॅस, फळे, भाजीपाल्याचे दर सातव्या गगनाला भिडले आहेत. पाकिस्तानी जनतेला दिलासा मिळताना दिसत नाही. आर्थिक संकटाचा सामना करत असलेल्या पाकिस्तानच्या चलनात मोठी घसरण झाली आहे. दुसरीकडे, मदत पॅकेजचा पुढील हप्ता जारी करण्यासाठी IMF टीम जानेवारीच्या अखेरीस पाकिस्तानला भेट देईल.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची मोठी घसरण

आर्थिक संकटाचा सामना करणार्‍या पाकिस्तानचा परकीय चलनाचा साठा झपाट्याने कमी होत आहे. गुरुवारी पाकिस्तानी रुपया डॉलरच्या तुलनेत 9.6 टक्क्यांनी घसरला. डॉलरच्या तुलनेत रुपया 255.4 रुपयांवर थांबला. तज्ज्ञांच्या मते, पहिल्यांदाच एवढी मोठी घट दिसून आली आहे.

IMF ची टीम भेट देणार

IMF टीम जानेवारीच्या अखेरीस पाकिस्तानला भेट देईल आणि मदत पॅकेजच्या पुढील टप्प्याच्या प्रक्रियेचा मार्ग मोकळा करेल. IMF ने गुरुवारी ही घोषणा केली. इम्रान खान यांच्या सरकारच्या काळात पाकिस्तानने 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) सोबत  6 अब्ज डॉलर  कर्ज करारावर स्वाक्षरी केली होती, जी गेल्या वर्षी 7 अब्ज डॉलर इतकी वाढली होती. कार्यक्रमाचा नववा आढावा सध्या IMF अधिकारी आणि सरकार यांच्यात 1.18 अब्ज डॉलर  जारी करण्यासाठी वाटाघाटींसह प्रलंबित आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, IMF टीम 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी या कालावधीत इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांशी मदत पॅकेजशी संलग्न असलेल्या अटींच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करेल. पाकिस्तानसाठी IMF निवासी प्रतिनिधी एस्थर पेरेझ रुईझ यांनी एका निवेदनात जाहीर केले की जागतिक कर्जदाता त्यांचे प्रतिनिधीमंडळ पाठवेल. निवेदनानुसार, अधिकाऱ्यांच्या विनंतीनुसार, नवव्या EFF पुनरावलोकनाचा भाग म्हणून चर्चा सुरू ठेवण्यासाठी IMF टीम 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी दरम्यान इस्लामाबादला भेट देईल.

परदेशी दायित्वाच्या आघाडीवर वाढती आव्हाने

स्टेट बँक ऑफ पाकिस्तानने आपल्या ताज्या चलनविषयक धोरणाच्या दस्तऐवजात हे मान्य केले आहे की विदेशी दायित्वे पूर्ण करण्याच्या आघाडीवर पाकिस्तानची आव्हाने वाढत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तानला या आर्थिक वर्षात विदेशी कर्जदारांना 23 अब्ज डॉलर्सची परतफेड करायची आहे. यातील 15 अब्ज डॉलरची जबाबदारी त्यांनी पूर्ण केली आहे. त्याला उर्वरित आठ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. याशिवाय चालू खात्यावरील दायित्वे आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या आर्थिक वर्षात पाकिस्तानची चालू खात्यातील तूट नऊ अब्ज डॉलर्सपर्यंत असू शकते.

पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून (IMF) लवकरच कर्ज मिळण्याची अपेक्षा नाही. परकीय चलनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. या आर्थिक वर्षात पाकिस्तानला सुमारे आठ अब्ज डॉलर्सचे कर्ज फेडायचे आहे. IMF ने स्पष्ट केले आहे की पाकिस्तान त्यांच्या अटी मान्य करत नाही तोपर्यंत 1.6 अब्ज डॉलरचा पुढील टप्पा जारी करणार नाही. पाकिस्तानला IMF कडून 6 हप्त्यांमध्ये 9 अब्ज डॉलर्सचे कर्ज द्यायचे होते. आतापर्यंत तीन अब्ज डॉलर्सचे दोनच हप्ते जारी करण्यात आले आहेत.