Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Pakistan Crisis: पाकिस्तानने सोमवारी पूर्ण रात्र अंधारात का काढली? हे आहे खरे कारण

Pakistan Electricity Shortage

Image Source : www.livemint.com

Pakistan Crisis: पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्याने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर NikkeiAsia.com या वेबसाईटला वीज पुरवठ्याबाबतचे सत्य सांगितले आहे. नेमकं त्याने काय सांगितलं हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

Pakistan Crisis: पाकिस्तानमध्ये अत्यंत हलाखीचे दिवस पाहायला मिळत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये उर्जा संकटाने अत्यंत गंभीर स्वरूप धारण केले आहे. खुद्द पाकिस्तानच्या सरकारी अधिकाऱ्यांनीच या बाबतचा इशारा दिला आहे. देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात घट झाल्यामुळे कच्च्या तेलाची(Crude Oil) आयात करणे दिवसेंदिवस पाकिस्तानसाठी कठीण होत असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले आहे. या ऊर्जा संकटामुळे सोमवारी रात्री तब्बल 16 तास वीज पुरवठा ठप्प झाल्याने तेथील जनतेला पूर्ण रात्र अंधारात काढावी लागली आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात.

इंधनाची बचत करण्यासाठी वीज केंद्रे रात्री बंद

पाकिस्तानात सोमवारी तब्बल 16 तास वीज पुरवठा ठप्प झाल्याने देशातील जनतेला पूर्ण रात्र अंधारात काढावी लागली आहे. प्रथमदर्शी पाकिस्तान सरकारने तांत्रिक बिघाडामुळे(Technical Problem) हे घडल्याचे सांगितले असले तरीही NikkeiAsia.com या वेबसाईटने आपल्या विशेष अहवालात हे ब्लॅकआउट इंधनाच्या घटत्या पुरवठ्याशी संबंधित असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. या वेबसाईटने पाकिस्तान सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मदतीने ही बातमी दिली आहे. या अधिकाऱ्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर ही माहिती दिली. त्याने सांगितले आहे की, ‘सरकारच्या आदेशामुळे इंधनाची बचत करण्यासाठी वीज केंद्रे रात्री बंद असणार आहेत. सोमवारी सकाळी संपूर्ण यंत्रणा सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही केला मात्र यंत्रणा ठप्प झाली होती.

आयातदारांना बँकेने कर्ज नाकारले

कच्च्या तेलाच्या व्यापाऱ्यांनी आधीच यासंदर्भात इशारा दिला होता. तेल कंपनी सल्लागार समितीने 13 जानेवारी रोजी पाकिस्तानच्या अर्थ मंत्रालयाला पत्र पाठवले होते. या संस्थेमध्ये तेल शुद्धीकरण, विपणन आणि पाइपलाईन कंपन्यांचे प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला होता. या कौन्सिलच्या पत्रात तेल उद्योगासमोर असलेल्या समस्यांचा उल्लेख करण्यात आला होता. यामधली अनेक समस्या या आयात अडथळ्यांशी संबंधित असून त्या पत्रात पाकिस्तानला दर महिन्याला 4.3 दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोल, 2 दशलक्ष टन हायस्पीड डिझेल आणि 6.5 दशलक्ष टन कच्चे तेल आयात करावे लागते. या सगळ्याचे एकूण बिल 1.3 अब्ज डॉलर्स इतके होते.
शनिवारी 14  जानेवारीला पाकिस्तानच्या विद्युत विभागाने स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या(State Bank of Pakistan) गव्हर्नरला पत्र पाठवले होते. ज्यामध्ये म्हटले आहे की, विविध बँका आयातदारांना कर्ज देण्यास नकार देत असल्यामुळे पेट्रोलियम साठ्याचे संपूर्ण नुकसान होऊ शकते. या बातम्यांमुळे देशात अराजकतेचे वातावरण पसरले आहे.

उर्जा साठ्यात घट झाल्यामुळे नवीन पुरवठा आवश्यक

पाकिस्तानी जनतेला अश्वस्त करण्याच्या प्रयत्नात, पाकिस्तानच्या तेल आणि वायू नियामक प्राधिकरणाने म्हटले आहे की, देशात उपलब्ध इंधन साठ्यातून 18 दिवसांपर्यंत गॅस व 37 दिवसांपर्यंत डिझेलची मागणी केली जाऊ शकते. मात्र NikkeiAsia.com शी बोललेल्या अधिकाऱ्याने सांगितले की, हा दावा खरा नाही. देशातील वास्तविक उर्जा साठा कमालीचा घटला असून सतत नवीन पुरवठा आवश्यक आहे. परंतु, परकीय चलनाच्या कमतरतेमुळे हे शक्य होणार नाही.