Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

CM medical relief fund : राज्य सरकारकडून 1 वर्षात 86 कोटी 49 लाख रुपयांची मदत; 10500 रुग्ण लाभार्थी

CM medical relief fund : राज्य सरकारकडून 1 वर्षात 86 कोटी 49 लाख रुपयांची मदत; 10500 रुग्ण लाभार्थी

राज्य सरकारकडून राज्यातील गरजू रुग्णांना आजारपणातील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( CM medical relief fund ) मदत केली जाते. यासाठी वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

सर्वसामान्य जनतेचा काहीवेळा उपचारावर होणार खर्च आवाक्याबाहेर असतो. दुर्दैवाने कित्येक रुग्णांना खर्चिक उपचारांना सामोरे जावे लागते. यासाठी येणाऱ्या खर्चाची तरतूद करण्यासाठी अनेकजण घर दागदागिणे गहाण ठेऊन प्रसंगी विक्री देखील करतात. मात्र हे सर्वांनाच शक्य होत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून राज्यातील गरजू रुग्णांना आजारपणातील उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ( CM medical relief fund ) मदत केली जाते. यासाठी वैद्यकीय सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून वर्षभरात कोट्यवधी रुपयांची मदत करण्यात आली आहे.

10500 रुग्णांना आर्थिक मदत

वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून राज्यातील वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी निधी दिला जातो. यामध्ये विविध शस्त्रक्रिया, गंभीर आजार यावरील उपचारांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात राज्य सरकारकडून तब्बल 10500 रुग्णांना उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून 1 वर्षात 86 कोटी 49 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. यामध्ये विविध जिल्ह्यातून सहाय्यता निधीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर ही मदत करण्यात आली आहे.  

'या' उपचार आणि शस्त्रक्रियांसाठी निधी

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून हृदय प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, किडणी प्रत्यारोपण, हाताचे प्रत्यारोपण, अपघात शस्त्रक्रिया, लहान बालकांची जटील शस्त्रक्रिया, मेंदूचे आजार,डायलिसिस, कर्करोगासाठी (केमोथेरपी/ रेडिएशन) यासह अन्य काही आजारांवरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी गरजू नागरिकांना निधी उपलब्ध करून दिला जातो.

वैद्यकीय आर्थिक सहाय्यता निधीसाठी अर्ज-

राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीची आवश्यकता भासत असल्यास त्यांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडे अर्ज करणे गरजेच आहे. याची माहिती घेण्यासाठी सरकारकडून 8650567567 हा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा अर्ज मोबाईलवर उपब्लध करून दिला जातो. तसेच cmrf.maharashtra.gov.in या इमेलच्या माध्यमातूनही तुम्हाला अर्ज दाखल करता येणार आहे.