Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto Account's Under Scrutiny: सावधान! 3 हजारांपेक्षा जास्त क्रिप्टो खात्यांतून चालू आहेत गैरव्यवहार

Crypto Account's Under Scrutiny

Crypto Account's Under Scrutiny: क्रिप्टो खात्यांतून गैरव्यवहार चालत असल्याचे तपासात समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांनी अनेक खात्यांवर कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या तपास पथकाने Financial Intelligence Unit (FIU) सुमारे 3,300 खात्यांवर कारवाई सुरू केली आहे.

क्रिप्टो खात्यांतून गैरव्यवहार चालत असल्याचे तपासात समोर आल्याने सुरक्षा यंत्रणांनी अनेक खात्यांवर कारवाई सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक गुन्ह्यांची चौकशी करणाऱ्या तपास पथकाने Financial Intelligence Unit (FIU) सुमारे 3,300 खात्यांवर कारवाई सुरू केली आहे. गैरव्यवहार करणाऱ्या या खात्यांची माहिती तपास पथकाने देशातील आणि परदेशातील क्रिप्टो एक्सचेंजला दिली आहे. आर्थिक गुन्ह्यांची उकल करणाऱ्या गुप्तचर विभागाने ही सर्व खाती बंद करण्याची शिफारस क्रिप्टो एक्सचेंजला केली असून इतर गुप्तचर विभागांचीही मदत घेतली आहे. मागील 8 महिन्यांपासून तपास पथक चौकशी करत होते. यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान या खात्यांतून गैरव्यवहार झाल्याचे तपासात पुढे आहे आहे.

अनैतिक कारवायांसाठी क्रिप्टो खात्यांचा वापर

या सर्व क्रिप्टो खात्यांचा वापर मनी लाँन्ड्रींग, अंमली पदार्थांचा व्यापार, दहशतवादी कारवाया, समाजात अशांतता पसरवण्याबरोबरच इतर अनैतिक कामांसाठी करण्यात येत असल्याचा संशय तपास पथकाला आहे. पुढील तपासासाठी ही माहिती आयकर विभाग, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि सक्तवसुली संचालनालय यांना माहिती पाठविण्यात आली आहे. तीन डिजिटल व्यवहार करणाऱ्या संस्थांची सखोल चौकशी केल्यानंतर ही माहिती हाती आली आहे.

28 हजार कोटींचे गैरव्यवहार  

2019 ते 2021 या तीन वर्षात अंमली पदार्थांच्या व्यापारासाठी क्रिप्टो करन्सीचा वापर करण्यात आला. ही रक्कम तब्बल 28 हजार कोटी एवढी होती. सामाजिक अशांतता किंवा दंगल पसरवणाऱ्या काही व्यक्तींच्या खात्यात रक्कम पाठवल्याचेही आढळून आले आहे. हे अनैतिक व्यवहार करण्यासाठी 'डार्क वेब'चा वापर करण्यात आला. मात्र, तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि तपास पथकांनी मिळून केलेल्या कामामुळे ही माहिती उघड झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

डार्क वेब म्हणजे काय? (What Is Dark Web)

सर्वसाधारण व्यक्ती इंटरनेट वापरायचे असल्यास गुगलवर जाऊन क्रोम किंवा फायरफॉक्स ब्राऊझरवर जाऊन पाहिजे त्या गोष्टींचा इंटरनेटवर शोध घेऊ शकतो. मात्र, डार्क वेब ही अशी संकल्पना आहे ज्याचा इंटरनेटवर वापर करण्यासाठी गुप्त ब्राऊझर वापरावा लागतो. तसेच या वेबसाईटचे डोमेन वेगळेच असते. उदाहरणार्थ .onion असे काहीसे डोमेन नेम असू शकते. या वेबसाइट इंटरनेटवर उपलब्ध तर असतात मात्र, निनावीपणे त्यांचा वापर करण्यासाठी त्याला सुरक्षेचे अनेक पदर असतात. त्यामुळे सर्वसाधारण इंटरनेट वापरताना तुम्हाला या वेबसाईट दिसणार नाहीत. याच डार्क वेबचा वापर करून क्रिप्टोचे गैरव्यवहार करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.