ओरियाना पॉवर (Oriana power) ही एक सोलर एनर्जीसंबंधी (Solar energy) व्यवसाय करणारी कंपनी आहे. पुढच्या आठवड्यात या कंपनीचा आयपीओ (Initial public offering) बाजारात धडकणार आहे. मात्र या आठवड्यातच त्याची चर्चा सुरू झाली आहे. गुंतवणूकदारांना फायदाच फायदा या माध्यमातून होणार आहे. या शेअर्सना ग्रे मार्केटमध्ये (Grey market) प्रतिसाद चांगला मिळत आहे. सध्या ओरियाना पॉवरचे शेअर 80 टक्क्यांहून जास्त प्रिमियमवर ट्रेड करत आहेत.
Table of contents [Show]
प्राइस बँड आणि कालावधी
पुढच्या आठवड्यात म्हणजेच साधारणपणे 1 ऑगस्ट 2023ला ओरियाना पॉवरचा आयपीओ सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. तर 3 ऑगस्टपर्यंत तो खुला असणार आहे. ओरियाना पॉवरच्या आयपीओची प्राइज बँड 115-118 रुपये निश्चित करण्यात आली आहे. सध्याची परिस्थिती पाहता ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर 95 रुपयांच्या प्रिमियमवर व्यवहार करताना दिसत आहेत.
गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण
ओरियाना पॉवरचे शेअर 118 रुपयांच्या अपर प्राइस बँडवर अलॉट झाले तसंच 95 रुपयांचां ग्रे मार्केट प्रिमियम अबाधित राहिला तर अंदाडे 213 रुपयांना समभाग लिस्ट होण्याची शक्यता आहे. या सर्व शक्यता गृहीत धरता गुंतवणूकदारांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. या शक्यता पाहिल्यास शेअर 80 टक्क्यांपेक्षाही जास्त नफा देणार आहे.
कधी लिस्ट होणार शेअर?
ओरियाना पॉवर कंपनीच्या आयपीओमध्ये शेअरचं वाटप 8 ऑगस्ट 2023ला अंतिम होईल. शेअर 11 ऑगस्टला लिस्ट होतील. कंपनीच्या आयपीओमध्ये एक लॉटसाठी रिटेल इन्व्हेस्टर्स अर्ज करू शकतात. एका लॉटमध्ये 1200 शेअर्स असणार आहेत. म्हणजेच इन्व्हेस्टर्सना 141600 रुपये लावावे लागणार आहेत.
पब्लिक इश्यू किती?
ओरियाना पॉवर कंपनीचा पब्लिक इश्यू 59.66 कोटी रुपये आहे. आयपीओआधी कंपनीत प्रमोटरचा वाटा 83.40 टक्के इतका आहे. एकदा का शेअर लिस्ट झाले की या टक्केवारीत घट होउन ते 61.41 टक्के होईल. त्यामुळे आता गुंतवणूकदार 1 ऑगस्टच्या ओरियाना आयपीओत गुंतवणूक करून 80 टक्क्यांहूनही अधिक फायदा घेण्यास उत्सुक आहेत.
(डिसक्लेमर : शेअर बाजार/म्युच्युअल फंड SIPमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्स आणि म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)