Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Duty Free Laptop : दुबईहून मागवा ड्युटी फ्री लॅपटॉप, जाणून घ्या 'हा' महत्त्वाचा नियम

Duty Free

Image Source : www.totmusicstudio.net

Dubai Duty Free: दुबईला अनेकजण फिरायला जातात आणि तिथून कुठली इलेक्ट्रॉनिक वस्तू आणायची असली तर खूप विचार करतात. कारण काय तर कस्टम ड्युटी. आपण आणलेल्या सामानावर 38.5% सीमा शुल्क (Custom Tarif) लावतील अशी शंका अनेकांना असते. परंतु तुम्ही काही गोष्टी ड्युटी फ्री पण आणू शकता. जाणून घ्या...

भारतापेक्षा दुबईचे इलेक्ट्रॉनिक मार्केट स्वस्त आहे. अनेक प्रकारच्या नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू तुम्हांला दुबई मार्केटमध्ये पाहायला मिळतील. तसं पाहायला गेलं तर दुबईला अनेकजण पर्यटनासाठी जात असतात. अनेकांची अशी ईच्छा असते की दुबईहून कमी किंमतीचा लॅपटॉप घेऊन यायला हवा. परंतु एअरपोर्टवर कस्टम अधिकारी (Custom Officer) त्यावर 38.5% सीमा शुल्क (Custom Tarif) लावतील अशी शंका अनेकांना असते. परंतु, आता काळजी करण्याचे कारण नाही. तुम्ही एक रुपया देखील सीमा शुल्क न भरता दुबईहून लॅपटॉप आणू शकता. काय म्हणता? विश्वास बसत नाहीये? तर जाणून घ्या काय आहे ड्युटी फ्री (Duty Free) लॅपटॉप आणण्यासाठी आवश्यक असलेला नियम.

कस्टम बॅगेज नियम 2021 ( Custom Baggage Rule) तुम्हांला माहिती हवा!

कस्टम बॅगेज नियम 2021 नुसार कुठल्याही देशातून तुम्ही केवळ एक लॅपटॉप खरेदी करून आणू शकता. आहे की नाही फायद्याची गोष्ट! एयरपोर्टवर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी पडताळणीसाठी थांबवल्यास तुम्ही त्यांना या नियमाची आठवण करून देऊ शकता. लॅपटॉप खरेदीचे बिल तुमच्याजवळ असेल तर उत्तमच! परंतु बिल नसले तरीही तुम्हांला अडवले जाऊ शकत नाही.

कोणकोणत्या गोष्टी ड्युटी फ्री आहेत?

  • वैयक्तिक समानाशिवाय 50,000 किंमतीच्या वस्तू तुम्ही आणू शकता.
  • विदेशी नागरिकांसाठी ही मर्यादा 15,000 इतकी आहे.
  • अल्कोहोल: 2 लिटर पर्यंत 
  • लॅपटॉप/ संगणक: 1 नग 
  • सिगारेट: 100 सुट्टे नग
  • सोन्याचे दागिने: पुरुषांसाठी 50,000 आणि स्त्रियांसाठी 1 लाख

बाहेरील व्यक्ती भारतात काही काळ थांबणार असेल तर नियम खालीलप्रमाणे

  • 3-6 महिन्यांसाठी मुक्काम: वैयक्तिक सामान आणि 60,000 रुपये मूल्यांचे सामान
  • 6-12 महिन्यांचा मुक्काम: वैयक्तीक सामान आणि 1 लाख रुपये मूल्यांचे सामान
  • 1-2 वर्षांचा मुक्काम: वैयक्तीक सामान आणि 2 लाख रुपये मूल्यांचे सामान
  • 2 किंवा त्याहून अधिक वर्षांचा मुक्काम: वैयक्तीक सामान आणि 5 लाख रुपये मूल्यांचे सामान

तेव्हा मित्रांनो, हे सगळे नियम माहिती असतील तर कस्टम ड्युटीचे टेंशन घेण्याची गरज नाही. वर सांगितलेल्या वस्तू कुठलेही सीमाशुल्क न भरता तुम्ही भारतात घेऊन येऊ शकता. चला तर मग, ही माहिती तुमच्या मित्रमंडळींसोबत देखील शेयर करा. किंवा कुणी मित्र दुबईला किंवा इतर देशात जाणार असेल तर त्याच्याकडून लॅपटॉप आदी वस्तू मागवा!