Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tesla Car Owners in India: भारतात फक्त चौघांकडे आहे महागडी टेस्ला कार, जाणून घ्या कोण कोण आहेत लिस्टमध्ये

Tesla Car

Tesla Car Owners in India: जवळपास 141 करोड लोकसंख्या असलेल्या देशात किती टेस्ला कार आहे माहिती आहे का? फक्त चार! काय म्हणता, विश्वास बसत नाही? पण हे अगदी खरं आहे. आपल्या देशात केवळ चारच अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे टेस्ला कार आहे. चला तर जाणून घेऊयात कोण कोण आहेत या लिस्टमध्ये?

टेस्ला कार खरेदी करणं हे अनेकांचं स्वप्न आहे, देशातील असे काही बिलेनिअर्स आहेत ज्यांच्या कलेक्शनमध्ये अजूनही टेस्ला दाखल झालेली नाही. टेस्ला ही एक सुपर फंक्शनल इलेक्ट्रिक कार असून, जगभरात तिला मागणी आहे. टेस्लाचे CEO Elon Musk यांनी हा टेस्ला हा ब्रँड भारतात आणण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून प्रयत्न चालवले आहेत. परंतु त्यांच्या प्रयत्नांना अजूनही यश आलेले नाही. परंतु येत्या काळात जर भारतात टेस्ला कार लाँच झाली तर अनेकांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं.

जवळपास 141 करोड लोकसंख्या असलेल्या देशात किती टेस्ला कार आहे माहिती आहे का? फक्त चार! काय म्हणता, विश्वास बसत नाही? पण हे अगदी खरं आहे. आपल्या देशात केवळ चारच अशा व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे टेस्ला कार आहे. चला तर जाणून घेऊयात कोण कोण आहेत या लिस्टमध्ये?

मुकेश अंबानी - टेस्ला Model S 100D

मुकेश अंबानी हे सध्या देशातील आणि आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती आहेत. त्यांच्याकडे Tesla S 100D ही कार आहे. 1.5 करोड किंमतीची ही कार मुकेश अंबानी यांची आवडती कार आहे असं म्हटलं जातं. एकदा चार्ज केली की ही कार 604 किलोमीटर धावू शकते. या कारची बॅटरी पॅक कॅपसिटी 100 kWh इतकी आहे. ही कार 250 किमी/तास इतका वेग देते. या गाडीत 7 लोक बसू शकतात.

या कारची बॅटरी 22-37 वर्षे कार्यरत राहू शकते,असा कंपनीचा दावा आहे. एकापेक्षा एक सुपर स्पेसिफिकेशन असल्यामुळे ही गाडी इतकी महागडी आहे. या कार व्यतिरिक्त अंबानी कुटुंबियांकडे 168 गाड्या आहेत. या गाड्यांच्या कलेक्शनमध्ये Rolls Royces, Bentleys आणि Mercedes अशा महागड्या गाड्या देखील आहेत.

रितेश देशमुख - टेस्ला Model X

रितेश देशमुख हा बॉलिवूडमधील एकुलता एक अभिनेता आहे ज्याच्याकडे टेस्ला ही कार आहे. रितेशला त्याच्या 40 व्या वाढदिवशी त्याच्या पत्नीने, जेनेलिया डिसूझा-देशमुख हिने रितेशला लाल रंगाची  Tesla कारचे Model X भेट दिली आहे.या कारची किंमत सर्व कर पकडून 2 कोटी इतकी आहे.
ही कार सात आसनी असून 3.2 सेकंदात 0-100 किमी/तास वेगाने धावण्यासाठी सक्षम आहे. एकदा कार फुल चार्ज केली की ती सुमारे 475 किमी अंतर कापू शकते. फाल्कन-विंग दरवाजे असलेली ही कार मुकेश अंबानी यांच्या टेस्ला कारपेक्षा महागडी आहे.

प्रशांत रुईया - टेस्ला Model X

प्रशांत रुईया हे एक भारतीय उद्योजक असून एस्सार कॉँगलोमेरेटचे ते सीईओ आहेत.भारतात सगळ्यांत पहिली कार प्रशांत रुईया यांनी खरेदी केली होती. यांच्याकडे देखील रितेश देशमुख सारखीच Tesla Model X ही कार आहे. 2017 साली त्यांनी ही कार खरेदी केलीये. या कारची किंमत देखील 2 कोटी इतकी आहे.

पूजा बत्रा - टेस्ला Model 3

पूजा बत्रा या पूर्वी बॉलिवूडमध्ये कार्यरत होत्या. सध्या त्या अभिनय क्षेत्रात कार्यरत नाहीत. त्यांच्याकडे टेस्लाची Model 3 ही कार आहे. पूजा यांनी ही कार लॉस एंजेलिसमध्ये राहात असताना ही कार खरेदी केली होती. एकदा की गाडी फुलचार्ज केली की,ही गाडी 386 किमी/तास पर्यंत प्रवास करू शकते. गाडीचा टॉप स्पीड 200 किमी इतका आहे. कार 5 सेकंदात 0-100 पर्यंत पिकअप घेऊ शकते. ही कार ऑटो-पायलट आणि सेल्फ-पार्क मोड सुविधा देखील देते.ही गाडी अमेरिकेत खरेदी करताना पूजा यांना ₹40 लाख रुपये इतका खर्च आला होता. ही गाडी भारतात आणताना पूजा यांना वेगळा खर्च करावा लागला आहे.

सध्या भारतात केवळ हे 4 व्यक्ती आहेत ज्यांच्याकडे टेस्ला कारचे मॉडेल आहे. 

Source:shorturl.at/aesK0