कोणत्याही ॲप किंवा वेबसाईटवरून प्राॅडक्ट खरेदी करताना प्राॅडक्टच्या किमतीची हिस्ट्री (History) पाहणे गरजेचे आहे. त्यावरून प्राॅडक्टचे मागील महिन्यातील रेट समजतील. यासाठी मार्केटमध्ये काही ॲप आणि वेबसाईटही आहेत. यासाठी तुम्हाला पीसी किंवा मोबाईलवर खरेदी करायचे असल्यास, त्यानुसार क्रोम एक्सटेंन्शन (Chrome Extensions) किंवा ॲप डाउनलोड करावे लागेल. त्यानंतर याचा वापर करून तुम्ही प्राॅडक्टचे मागील काही दिवसातील रेट काढू शकता. हे केल्याने ते कधी खरेदी करता येईल, याची आयडिया मिळण्यास मदत होईल. अशा पद्धतीने तुम्ही प्राॅडक्टच्या किमतीला ट्रॅक करू शकता आणि जेव्हा ती कमी होईल तेव्हा विकत घेवू शकता.
Table of contents [Show]
घरबसल्या करा तुलना!
मार्केटमध्ये प्रत्येक ठिकाणी फिरून, प्राॅडक्टचा भावातील फरक काढणे अवघड आहे. पण , ऑनलाईन शॉपिंगचा हाच फायदा आहे. तु्म्ही घरबसल्या कोणती वेबसाईट कमी किमतीत वस्तू देत आहे. हे पाहू शकता. यासाठी तुम्हाला त्या संबंधित वेबसाईट सर्च कराव्या लागतील. सर्च करून त्याची तुलना करावी लागेल असे केल्यास, कुठे कमी किमतीत मिळत आहे. हे तुम्हाला लगेच समजू शकते. नेहमी तुलना करायची सवय लावल्यास बरीच बचत होवू शकते.
मान्सून सेलची करा प्रतिक्षा
मान्सून सीझनमध्ये खूप सेलर त्यांचा माल जास्त डिस्काउंट देवून विकतात. त्यामुळे या सीझनची वाट पाहिल्यास बऱ्याच वस्तू एकदम स्वस्त दरात तुम्ही खरेदी करू शकता. यामध्ये सर्वच वस्तूवर भरपूर डिस्काउंट असतो. तसेच, सणवार याच सीझनमध्ये येत असल्याने त्याचा ही वेगळाच डिस्काउंट तुम्हाला पाहायला मिळू शकतो. काही वस्तूंवर वेबसाईट 50 ते 75 टक्क्यांपर्यंत सूट देते. त्यामुळे तुम्ही सेलबाबत अपडेट राहिल्यास, तुम्हाला हवी ती वस्तू, पाहिजे त्या रेटमध्ये घेता येवू शकते.
'ह्या' ट्रिक्सने होईल जास्त बचत!
तुम्हाला शॉपिंग केल्यावर ती घरपोच मोफत हवी असल्यास, एकदाच सामान खरेदी करा. असे केल्यास, तुम्ही फ्री शिपिंगसाठी पात्र व्हाल. त्याचबरोबर अजून एक पद्धत आहे. एखाद्या वेबसाईट किंवा ॲपवरून तुम्ही नियमित खरेदी करत असल्यास, ते कधी-कधी मोफत शिपिंगची ऑफर देतात. तेव्हाही ही तुम्ही खरेदी करून पैसे वाचवू शकता. वाचणारी रक्कम कमी असली तरी, प्रत्येक वेळी असे केल्यास, पैशांची चांगली बचत होवू शकते.
सेलरची रेटिंग पाहाच
प्राॅडक्ट घ्यायच्या आधी सेलरची रेटिंग पाहणे गरजेची आहे. तसे न करता तुम्ही विकत घेतल्यास तुम्हाला व्हेरिफाय नसलेल्या सेलरचे प्राॅडक्ट घ्यावे लागेल. मग त्या प्राॅडक्टच्या क्वालिटीवर प्रश्न उपस्थित राहू शकतो. त्यामुळे सेलर व्हेरिफाय केलेला आहे की नाही हे त्याची रेटिंग पाहिल्यावर समजू शकते. त्यामुळे वस्तू घ्यायच्या आधी ते कराच.
शॉपिंग करणं खूप सोपं झालं असलं तरी, त्यासाठी करावी लागणारी मेहनत सारखीच आहे. आधी बाहेर जायला लागायचं, आता घरातूनही करता येवू शकते. यासाठी मीडिया आणि वेबसाईटवर नेहमी फिरत राहावं लागतं. तरच आपल्याला ऑफर आणि इतर गोष्टी माहिती होतात.