Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Gaming Stock: ऑनलाईन गेमिंग स्टॉक्स गडगडले, जीएसटी लागू झाल्याचा शेअरला फटका

GST

Online Gaming Stock: जीएसटी कौन्सिलने ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंगवर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये उमटले. ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये 5 ते 25% घसरण झाली.

जीएसटी कौन्सिलने ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो आणि हॉर्स रायडिंगवर 28% जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतल्याचे पडसाद आज शेअर मार्केटमध्ये उमटले. ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील प्रमुख शेअर्समध्ये 5 ते 25% घसरण झाली.

मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला ऑनलाईन गेमिंग, कॅसिनोवरील जीएसटी लागू करण्याचा प्रश्न अखेर निकाली निघाला आहे. जीएसटी कौन्सिलची 11 जुलै रोजी बैठक झाली. या बैठकीत ऑनलाईन गेमिंगवर 28% जीएसटी लागू करण्याची घोषणा केली. यामुळे आजवर कर कक्षेपासून चार हात लांब असलेल्या ऑनलाईन गेम्स तयार करणाऱ्या कंपन्यांचे आर्थिक गणित बिघडणार आहे.

सरकारच्या निर्णयाचा डेल्टा कॉर्प या कंपनीच्या शेअरला सर्वाधिक फटका बसला. आज डेल्टा कॉर्पचा शेअर 24% पर्यंत घसरला. डेल्टा कॉर्पला लोअर सर्किट लागले.  सध्या डेल्टा कॉर्पचा शेअर 22.68% घसरणीसह 190.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. यामुळे कंपनीच्या मार्केट व्हॅल्यूमध्ये 1650 कोटींची घसरण झाली.

शेअर मार्केटमधील ऑनलाईन गेमिंग, कॅसिनो क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअरला देखील झळ बसली. नझारा टेक्नॉलॉजी, झेंसर टेक्नॉलॉजी, ऑनमोबाईल ग्लोबल या कंपन्यांचे शेअर 1 ते 10% घसरले.  नझारा टेक्नॉलॉजीचा शेअर 6% घसरला होता. सध्या तो 3.65% घसरणीसह 680.70 रुपयांवर ट्रेड करत आहे.

झेंसर टेक्नॉलॉजीचा शेअर सकाळच्या सत्रात घसरला होता. सध्या तो सावरला आहे. तो 391.50 रुपयावर ट्रेड करत आहे. ऑनमोबाईल ग्लोबल लिमिटेड या कंपनीजचा शेअर 76.33 रुपयांवर ट्रेड करत असून त्यात 3.68% घसरण झाली.

सरकारने ऑनलाईन गेमिंग, हॉर्स रायडिंग आणि कॅसिनो यावर 28% जीएसटी लागू केला आहे. ऑनलाईन गेम आणि कौशल्य यात कोणतीही सूट किंवा भेदभाव न ठेवता सरसकट 28% कर लागू करण्याचा निर्णय जीएसटी कौन्सिलच्या मंत्रिगटाने घेतला असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले.

सध्या ऑनलाईन बेटींग, गॅम्बलिंग यावर 28% टॅक्स आहे पण ते कौशल्य किंवा संधी यावरुन लागू केला जातो. इतर गेम्सवर 18% हा गेममधून मिळणाऱ्या एकूण महसुलावर लागू केला जातो. आता सरसकट जीएसटी लागू केल्याने कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता आहे.