Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Online Food Order : ऑनलाईन खाद्यपदार्थ ऑर्डर केल्यावर चुकीचे पार्सल मिळालं तर काय कराल?

Online Food Order

Online Food Order : एका महिलेने भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Swiggy वर नुकतीच व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती. मात्र, बिर्याणीचं पार्सल उघडल्यावर तिला कळलं की, नॉन-व्हेज बिर्याणीचं पार्सल आपल्याला मिळाले आहे. आता मुळातच पूर्णपणे शाकाहरी असलेली ही महिला रेस्टॉरेंट मालकावर दावा ठोकू शकेल की नाही

नताशा भारद्वाज नावाच्या एका महिलेनं भारतातील सर्वात लोकप्रिय ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या Swiggy वर नुकतीच व्हेज बिर्याणी ऑर्डर केली होती. मात्र, तिला त्या बिर्याणी मध्ये मांसाचा तुकडा सापडला. या महिलेने तिला आलेला हा अनुभव ट्विटरवर शेअर केला. त्यात तिने म्हटले आहे की, 'मी स्विगीवरील रेस्टॉरेंट पार्टनरकडून  शाकाहारी बिर्याणी भात ऑर्डर केला होता, परंतु त्यात मासाचा तुकडा सापडला. त्या बिर्याणीचा फोटो शेअर करत, नताशा नावाच्या या महिलेने तिरस्कार व्यक्त केला आहे. आणि म्हटले की, तुम्ही जर का कठोर शाकाहारी असाल तर, स्विगीवरून ऑर्डर करण्यापूर्वी दोनदा विचार करा.'

पूढे या महिलेने आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी थेट रेस्टॉरंटच्या मालकाला फोन करण्याची सूचना स्विगी अधिकाऱ्यांना केली. तर स्विगीने तिच्या ट्विटरला प्रतिउत्तर देतांना म्हटले की, 'हाय नताशा! आमच्या रेस्टॉरंट भागिदारांकडून अशा प्रकारची चूक होणे अपेक्षित नाही. तुम्ही आम्हाला तुमचा ऑर्डर आयडी द्या, आम्ही ते पार्सल बघून नक्की तुम्हाला मदत करु.' नताशा या महिलेने तिचे एक्झिक्युटिव्हसोबतचे संभाषण आणि ऑर्डरचे तपशीलही तिच्या ट्विटरवर शेअर केले आहे.

अनेकांना आलेत असले अनुभव

नताशा यांनी शेअर केलेल्या या घटनेने सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून, अनेकांनी रेस्टॉरंटच्या चुकीबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त केला आहे. तर अनेक यूजर्सने विविध रेस्टॉरंटमधून ऑर्डर केलेल्या शाकाहारी पदार्थांमध्ये मांसाचे तुकडे मिळण्याचे त्यांचे स्वतःचे अनुभव देखील शेअर केले आहेत.

असा अनुभव तुम्हाला आला तर...

ज्या विश्वसनीय फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मवर आपण प्रचंड विश्वास ठेवतो, त्यांच्या कडून खाद्यपदार्था बाबत कुठलीही चुक झाल्यास अथवा त्यांनी चुकीचे तसेच निकृष्ठ दर्जाचे खाद्य पदार्थ आपल्याला डिलिव्हर केल्यास आपण आपली तक्रार त्या कंपनी व्यतिरिक्त आणखी काही ठिकाणी करु शकतो, जेणे करुन आपण ती लढाई कायदेशीरपणे लढता येईल. जसे की, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI), ग्राहक तक्रार निवारण आयोग (Consumer Grievance Redressal Commission) येथे आपण त्या कंपनी विरोधात तक्रार दाखल करु शकतो. तसेच त्या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म विरोधात आणि रोस्टॉरंट विरोधात दिवाणी खटला दाखल करुन, मानसिक आणि आर्थिक नुकसानीचा दावा ठोकू शकतो.

या अशा घटनांमुळे अन्न सुरक्षा आणि सदोष तसेच ताज्या अन्नपदार्थाचा दावा करणाऱ्या रेस्टॉरेंट आणि  फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या जबाबदारीवर अनेक महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात. तसेच या महिलेसह ट्विटरवर  ट्विट करीत शेअर केलेल्या अनेकांचे अनुभव अन्न उद्योगात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाच्या गरजेची आठवण करून देतो.