Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

One-time investment vs SIP investment: बेस्ट रिटर्नसह, मोठी रक्कम जमा करायची आहे? वाचा सविस्तर

One-time investment vs SIP investment

Image Source : www.yourstory.com/www.wikifinancepedia.com

One-time investment vs SIP investment: बेस्ट रिटर्न कोणाला नको आहेत. पण त्यासाठी योग्य प्लॅनिंग असणे गरजेचे आहे. यासाठी बरेच जण एकठोक रक्कम किंवा SIP मध्ये गुंतवणूक करतात. मात्र, दोन्हींची वेगवेगळी विशेषता आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी बेस्ट राहिल. याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

One-time investment vs SIP investment: आपण कुठे गुंतवणूक करणार आहोत. यावर सगळ्या गोष्टी ठरतात. तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये एकठोक किंवा SIP करत असाल तर दोन्ही ठिकाणी रिस्क आहे. मात्र, हेच जर तुम्ही व्यवस्थित रिसर्च किंवा सल्लागारांची मदत घेऊन गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. तसेच, दोन्ही ठिकाणी गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे-तोटे आहेत. 

तुम्ही एकठोक रक्कम गुंतवायचा विचार करत असल्यास तुमच्याजवळ तेवढी रक्कम असणे आवश्यक आहे. पण, हेच जर तुम्ही SIP करणार असाल तर तुम्हाला एका ठरावीक अंतराने पैसे भरण्याची मुभा असते. म्हणजेच तुम्ही महिन्याला एक ठरावीक रक्कम भरु शकता. मात्र, तुम्हाला दोघांपैकी एकातून बेस्ट रिटर्न आणि मोठी रक्कम जमा करायची असल्यास तुम्हाला काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

दोघात फरक काय आहे?

SIP मध्ये गुंतवणूक करताना तुम्हाला मार्केट समजून गुंतवणूक करायची गरज नाही. कारण, ते वेगवेगळ्या मार्केटच्या सायकलमध्ये सहज प्रवेश करु शकते. मात्र, तेच तुम्ही एकठोक रक्कम गुंतवायचा विचार करत असाल तर तुम्हाला मार्केट सायकल आणि  गुंतवणुकीसाठी योग्य वेळ कोणती आहे, हे ओळखता येणे गरजेचे आहे. 

तसेच, एकठोक रक्कम गुंतवण्यासाठी तुमच्याजवळ रिस्क घेण्याची क्षमता आणि पैसे असायला हवे. याशिवाय SIP मध्ये तुम्ही सोयीप्रमाणे गुंतवणूक करु शकता आणि यात रिस्कही कमी असते.

SIP चा मोठा फायदा म्हणजे कंपाउंडिंगची पावर होय. यामुळे कमाई केलेल्या व्याजाची नवीन हप्त्यांसह पुन्हा गुंतवणूक करण्यास मदत होते आणि अधिक रिटर्नची खात्री मिळते. हेच एकठोक गुंतवणुकीत गुंतवणुकदार त्यांनी कमावलेले व्याज पुन्हा गुंतवू शकतात आणि कंपाउंडिंगचा फायदा घेऊ शकतात.  मात्र, मूळ रक्कम तशीच राहते.

SIP मुळे नियमित बचतीची सवय लागायला मदत होते, तर एकठोक गुंतवणुकीमुळे एकाच वेळी सर्व पैसे वाचवता येतात आणि जास्त खर्च होण्याची शक्यता दूर होते. त्यामुळे दोन्ही त्यांच्या जागी बेस्टच आहेत.

दोन्हीतून बेस्ट कोणती आहे?

गुंतवणुकीची सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुमचे उद्दिष्ट होय. तुम्हाला जर दीर्घ काळासाठी किंवा अल्पमुदतीसाठी मोठी रक्कम जमा करायची असेल तर त्यानुसार गुंतवणूक करणे फायद्याचे ठरु शकते. जसे की, तुम्हाला दीर्घ काळात मोठी रक्कम जमा करायची असल्यास  गुंतवणुकीसाठी SIP बेस्ट पर्याय ठरु शकतो. 

तर अल्पमुदतीसाठी म्हणजेच शाॅर्ट टर्मसाठी जास्त रक्कम हवी असल्यास एकठोक रक्कम गुंतवणे बेस्ट पर्याय ठरु शकतो. कारण, दोन्ही ठिकाणी बेस्ट रिटर्न मिळतो. फक्त त्यासाठी तुमचा रिसर्च आणि मार्केटवरील तुमची पकड आवश्यक आहे.  

(डिसक्लेमर : म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' म्युच्युअल फंड खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)