Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Royal Enfield Offer: 'या'वेबसाईटवर Royal Enfield बुलेट मिळतीये 50 ते 70 हजारांमध्ये; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Royal Enfield Offer

Image Source : www.royalenfield.com

Royal Enfield Offer: Royal Enfield Classic 350 या बाईकची किंमत 1.9 लाख रुपयांपासून सुरू होते व टॉप मॉडेल 2.21 लाख रुपयांपर्यंत मिळते.

Royal Enfield Offer: सध्याच्या तरुण वर्गाला सर्वात जास्त भुरळ घालणारी बाईक म्हणजे रॉयल एनफिल्ड(Royal Enfield). प्रत्येकाला कधी ना कधी तरी ही बुलेट(bullet) चालवण्याची इच्छा असतेच असते. रॉयल एनफिल्ड बाईक्स(Royal Enfield Bike) भारतात प्रचंड लोकप्रिय असून 350 सीसी मधील सेगमेंटमध्ये या बाईक बेस्ट सेलर(Bike Best seller) ठरत आहेत. क्रूझर बाईक सेगमेंट हा टू व्हीलर सेगमेंटचा एक लोकप्रिय सेगमेंट असून ज्यामध्ये इंजिन स्टाईल आणि परफॉर्मन्ससाठी आगामी बाइकर्सना(Bikers) प्राधान्य दिले जाते. क्रूझर बाईक(Cruiser Bike) सेगमेंटमध्ये रॉयल एनफील्डकडे(Royal Enfield) सर्वाधिक बाईक्स आहेत. पण तुम्हाला ठाऊक आहे का? लाखो रुपये किंमत असलेली ही बाईक तुम्हाला 'या'साईटवर 50 ते 70 हजारांमध्ये मिळणार आहे. कधी कुठे आणि कशी चला जाणून घेऊयात.

Royal Enfield Classic 350 बाईकची किंमत?

Royal Enfield Classic 350 या बाईकची किंमत 1.9 लाख रुपयांपासून सुरू होते व टॉप मॉडेल(Top Model) 2.21 लाख रुपयांपर्यंत जाते. या बाईकची किंमत(Bike Price) सर्वसामान्य लोकांना परवडणारी नसल्याने प्रत्येक सामान्य माणूस ती खरेदी करू शकत नाही मात्र आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. ही बाईक तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. लोकांची बजेट संदर्भातील हीच समस्या लक्षात घेऊन आज आम्ही तुम्हाला Enfield Classic 350 च्या सेकंड हँड मॉडेलवर(Second Hand Model) उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल(Offer) माहिती देणार आहोत, ज्यामध्ये ही बाईक 50,000 ते 1,00,000 च्या बजेटमध्ये सहज मिळू शकते. Royal Enfield Classic 350 च्या दुसऱ्या मॉडेल्सवरील ऑफर्स सेकंड हँड वाहनांशी संबंधित असून ऑनलाईन वेबसाईटवरून(Online Website) घेण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये तुम्हाला आजच्या सर्वोत्तम तीन ऑफरबद्दल तपशील कळतील.  

‘या’ वेबसाईटवर स्वस्तात मिळतायेत बाईक

OLX वेबसाईट

OLX ही ऑनलाईन साईट आपल्या सगळ्यानांच माहित आहे. सेकंड हँड रॉयल एनफील्ड क्लासिक 350 ची ऑफर OLX वेबसाईटवर उपलब्ध आहे. येथे दिल्ली नोंदणीसह क्लासिक 350 चे 2012 चे मॉडेल विक्रीसाठी सूचीबद्ध करण्यात आले आहे. या बाईकची किंमत 60,000 रुपये निश्चित करण्यात आली असून तिच्या खरेदीवर कोणत्याही प्रकारचा फायनान्स प्लॅन ग्राहकांना दिला जाणार नाही.

BIKES4SALE वेबसाईट

BIKES4SALE वेबसाईटवर रॉयल एनफील्ड क्लासिक 350 वर दुसरी ऑफर उपलब्ध आहे. दिल्ली येथील नंबर प्लेट असलेले 2013 चे मॉडेल विक्रीसाठी आहे. बाईकची किंमत 65,000 निश्चित करण्यात आली असून त्यासोबत ग्राहकांना फायनान्स प्लॅन देखील उपलब्ध करून दिला जाणार आहे

BIKEDEKHO वेबसाईट

आजची तिसरी स्वस्त ऑफर BIKEDEKHO वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आली असून दिल्ली येथील नोंदणीसह हे मॉडेल 2014 सालचे आहे. या मॉडेलसाठी विक्रेत्याने 70,000 किंमत निश्चित केली असून या क्रूझरच्या खरेदीवर कोणताही ऑफर प्लॅन दिला जाणार नाहीये.