Profit-making Olatech Solutions Limited's Stock: शेअर बाजाराविषयी निश्चित स्टॉकची माहिती कोणीच देऊ शकत नाही, पण असे म्हटले जाते की कंपनीचे फंडामेंटल स्ट्राँग असेले किंवा मजबूत असले तर चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते. या सर्व जर - तरच्या गोष्टी आहेत. ओलाटेक सोल्युशन लिमिटेड या एसएमई (SME: Small and medium-sized enterprises) कंपनीने 200 टक्क्यांहून अधिक परतावा आपल्या गुंतवणुकदारांना दिला आहे. कंपनीने शेअर बाजारात 29 ऑगस्ट 2022 रोजी केली आहे. एवढ्या कमी कालावधीत कंपनीने परतावा दिल्यामुळे सध्या या स्टॉकटची चर्चा होत आहे.
ओलाटेक सोल्युशन कंपनी 2022 साली बाजारात आलेली तेव्हा कंपनीचा प्राइस बँड 27 रुपये एवढा होता. बीएसई एसएमईमध्ये (BSE SME) कंपनीची लिस्टिंग 51.30 रुपयांवर झाली होती. अर्थात, ज्या गुंतवणूकदाराला कंपनीचे शेअर अलॉट झाले होते, त्याचवेळी त्या गुंतवणुकदारांना 90 टक्क्यांचा परतावा बाजारात डेब्यू करतानाच मिळाला होता. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीचे शेअर 53.85 रुपयांवर पोहोचल्यावर, लिस्टिंगच्या दिवशीच बंद झाले होते.
मुख्य म्हणजे, ओलाटेक सोल्युशन कंपनीच्या शेअर्सना लिस्टिंगनंतरही ब्रेक लागलेला नाही, उलट स्टॉकने जास्त स्पीड पकडला. एसएमई कंपनीच्या शेअरचा भाव 133 यांच्या रेकॉर्ड लेव्हलपर्यंत पोहोचला होता. मात्र, यानंतर या शेअरमध्ये घसरण दिसून आली आणि तो घसरून 85.80 रुपयांवर आला. या घसरणीनंतरही, कंपनीचे शेअर्स लिस्टिंगपासून आतापर्यंत होल्ड करणारे गुंतवणूकदार फायद्यात आहेत. गेल्या 5 महिन्यांदरम्यान ओलाटेक सोल्युशिन लिमिटेडने (Olatech Solutions Limited) 200 टक्क्यांहूनही अधिक परतावा दिला.
5 महिन्यांत झाले 1.08 लाखाचे 3.40 लाख! (3.40 lakhs of 1.08 lakhs in 5 months)
कंपनीने जेव्हा आयपीओ आणला होता, तेव्हा इश्यू प्राईस 27 रुपये एवढी होती. त्यावेळी कंपनीने 4 हजार शेअर्सची लॉट साईज ठेवली होती. अर्थात, एका गुंतवणूकदाराला किमान 1.08 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती. आतापर्यंत होल्ड केलेल्या, या गुंतवणूकदारांचे पैसे वाढून 3.43 लाख रुपयांवर पोहोचले आहेत.