अनिवासी भारतीयांद्वारे (NRI) महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ गेल्याकाही वर्षात वाढला आहे. एनआरआय व्यक्तींकडून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली जात असून, यामुळे राज्याचा आर्थिक विकासाला देखील होत आहे.
अनिवासी भारतीय रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, आयटी सारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असून, याद्वारे स्थानिकांसाठी रोजगाराच्या चांगल्या देखील निर्माण होत आहे. अनिवासी भारतीयांद्वारे राज्यातील कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक केली जात आहे व याद्वारे कशाप्रकारे रोजगार निर्मिती होत आहे? याबाबत जाणून घेऊयात.
अनिवासी भारतीयांची महाराष्ट्रात सर्वाधिक गुंतवणूक
देशाबाहेर राहणाऱ्या अनिवासी भारतीयांची गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती महाराष्ट्राला असल्याचे गेल्याकाही वर्षात दिसून आले आहे. अनिवासी भारतीयांद्वारे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली जात आहे. अमेरिका, सिंगापूर, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशात राहणाऱ्या अनिवासी भारतीयांकडून महाराष्ट्रासह देशभरातील उद्योगक्षेत्रांमध्ये गुंतवणूक केली जात आहे.
दरवर्षी एनआरआयकडून हजारो कोटी रुपये रिअल इस्टेट व इतर क्षेत्रात गुंतवणूक केली जात आहे. एफडीआयच्याबाबतीत देखील महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात पुढे आहे. बिझनेस लाइनच्या रिपोर्टनुसार, 2022-23 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एफडीआयच्या माध्यमातून तब्बल 11,18,422 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती.
अनिवासी भारतीय या क्षेत्रात करत आहेत गुंतवणूक
रिअल इस्टेट | अनिवासी भारतीयांकडून महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती रिअल इस्टेट क्षेत्राला दिली जात आहे. मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये खासगी व व्यावसायिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याकडे कल असल्याचे दिसून येते. या शहरांमध्ये वाढणाऱ्या उद्योगांमुळे गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती दिली जाते. |
उत्पादन | महाराष्ट्रातील अनेक शहरं उद्योग-धंद्यांसाठी, मोठमोठ्या मॅन्युफॅक्चरिंग फॅक्ट्रींसाठी ओळखले जातात. त्यामुळे अनिवासी भारतीयांकडून अशा उद्योगांमध्ये गुंतवणुकीला प्राधान्य दिले जाते. ऑटमोबाईल्स, फार्मास्युटिकल्स आणि टेक्सटाइल्स यांसारख्या क्षेत्रात सर्वाधिक गुंतवणूक केली जात आहे. |
आयटी | राज्यातील पुणे सारखे शहर आयटी हब म्हणून ओळखले जाते. याशिवाय, अनेक स्टार्टअप्सची मुख्यालय देखील राज्यात आहे. त्यामुळे अनिवासी भारतीयांकडून आयटी सेक्टर, स्टार्टअप्स व इतर कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जात आहे. |
अनिवासी भारतीयांच्या गुंतवणुकीद्वारे रोजगार निर्मिती
अनिवासी भारतीय राज्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात मोठी गुंतवणूक करत असल्याने स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी देखील निर्माण होत आहेत. फॅक्ट्री, पायाभूत सुविधा व इतर प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्याने स्थानिकांना रोजगार मिळत आहेत. याशिवाय, गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने उद्योगांना देखील चालना मिळत आहे. यामुळे आपोआपच रोजगार उपलब्ध आहेत.