Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Voter registration: आता वर्षातून 4 वेळा मतदार नोंदणी करता येणार, जाणून घ्या डिटेल्स

Voter registration, When can one apply for voter registration?

Image Source : http://www.voteridcard.org.in/

Voter registration: वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले की, मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होतो. नवीन मतदारांना लगेच नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याने जिल्हा निवडणुक अधिकाऱ्याने नवीन नियम लागू केला आहे. त्यामुळे आता नवीन मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत सहज नोंदवता येणार आहेत.

Voter registration: वयाचे 18 वर्ष पूर्ण झाले  की, मतदान करण्याचा अधिकार (authority)प्राप्त होतो. नवीन मतदारांना लगेच नाव नोंदणी करणे गरजेचे असल्याने जिल्हा निवडणुक अधिकाऱ्याने नवीन नियम लागू केला आहे. त्यामुळे आता नवीन मतदारांना त्यांची नावे मतदार यादीत (voter List) सहज नोंदवता  येणार आहेत. भारतीय निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India) नवीन मार्गदर्शक तत्त्वांनंतर, मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी वर्षभरात चार संधी असतील. दरवर्षी 1जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1ऑक्टोबर (January, April,  July and October) या पात्रता तारखा मानल्या जातील. नवीन मतदार ज्या तिमाहीत वयाची 18 वर्षे पूर्ण करेल, त्या तिमाहीत त्याचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाईल, याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

कधी करू शकता नोंदणी अर्ज? (When can registration application?)

17वर्ष पूर्ण झालेल्या  तरुणांसाठी आगाऊ अर्ज करण्याची सुविधा देखील सुरू झाली आहे. त्यांना फक्त 1 जानेवारीच्या पात्रता तारखेची वाट पाहण्याची गरज नाही. यापुढे प्रत्येक तिमाहीत मतदार यादी अपडेट  केली जाईल आणि पात्र तरुणांची नोंदणी ज्या वर्षात त्यांनी पात्रता वयाची 18 वर्षे पूर्ण केली असतील त्या वर्षाच्या पुढील तिमाहीत नोंदणी करता येईल. नोंदणीनंतर, त्यांना मतदारांचे फोटो ओळखपत्र (EPIC) देण्यात येईल.

निवडणूक आयोगाकडून मिळालेली माहिती (Information from Election Commission)

जिल्हा निवडणूक अधिकारी (District Election Officer) यांच्या बैठकीत ही  माहिती देण्यात आली. या बैठकीत नोंदणीकृत मतदारांची ओळख आधारशी जोडणे, काढून टाकणे, बदल करणे आणि लिंक करणे (Adding, deleting, modifying and linking) याबाबत  निवडणूक आयोगाकडून माहिती देण्यात आली. मतदार यादीशी आधार लिंक करण्याचे काम पूर्णपणे केले जाईल, असेही तेथे सांगण्यात आले की, 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर रोजी वयाची 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक नागरिकाने पुढील विशेष कार्यक्रमात त्यांची नावे मतदार यादीत नोंदवावीत. यासाठी ऑनलाइन फॉर्म (Online form) देखील भरता येईल किंवा बूथ लेव्हल ऑफिसर (Booth Level Officer)(बीएलओ) किंवा मतदार सेवा केंद्राची मदत घेता येईल.

आधार डिटेल्स  सार्वजनिक केली जाणार नाही (Aadhaar details will not be made public)

आधार संकलनाचा मुख्य उद्देश मतदार यादीतील नोंदणीकृत मतदारांची ओळख सुनिश्चित करणे आहे. यामध्ये अशा मतदारांना देखील चिन्हांकित केले जाईल, ज्यांची नावे एकाच विधानसभा मतदारसंघात (Assembly Constituency) दोनदा नोंदणीकृत आहेत किंवा एकापेक्षा जास्त विधानसभांमध्ये नोंदणीकृत आहेत. आधार डिटेल्स  कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक केला जाणार नाही. मतदारांशी संबंधित माहिती सार्वजनिकपणे प्रदर्शित करणे आवश्यक असल्यास, आधार तपशील अनिवार्यपणे काढून टाकणे किंवा झाकणे आवश्यक आहे.